वसई भाजपाच्या दूध दरवाढ आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे दही!
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या 'चमको' आंदोलनावर वसईकरांची टीका!
विरार (प्रतिनिधी), दि. ०३ जुलै, २०२०: आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याच काखेतील पदाधिकाऱ्यांना 'अध्यक्ष'पदांची खिरापत वाटून झाल्यानंतर भाजपचे वसई जिल्हाध्यक्ष राजन नाईक थेट राज्य सरकारविरोधातील बीजबिल आणि दूध दरवाढ़ आंदोलनात दिसून आले. मात्र या आंदोलनात राजन नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंचे पार 'दही' केल्याने त्यांच्या या 'चमको' आंदोलनावर वसई-विरारकरांनी तीव्र टीका केली आहे.
कोविड-१९ च्या संकटाशी झुंझणाऱ्या राज्य सरकारला भाजप काही न काही करून कात्रीत पकड़ू पाहत आहे. शनिवारी याचाच एक भाग म्हणून राज्यात राज्य सरकारविरोधात भाजपने वीजबिल आणि दूधदरवाढ़ीविरोधात आंदोलन केले.

याच आंदोलनाची री ओढ़त वसई भाजपही जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरला होता. या वेळी राजन नाईक आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत वीजबिलात सवलत, तर दूध भुकटीला ५० रुपयांपर्यंत अनुदान देण्याची मागणी केली.
मात्र भाजपच्या या अतिउत्साही आंदोलनात 'सोशल डिस्टनसिंग' नियमांचे पार दही घातले गेले. विशेष म्हणजे करोनाच्या तीन महिन्याच्या काळात जनतेशी 'सोशल डिस्टनसिंग' पाळून असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक आणि कार्यकर्ते शनिवारी सरकारविरोधी आंदोलन करताना दिसल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे राजन नाईक यांच्या 'चमको' आंदोलनाची सध्या टिकात्मक चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे या आधी राजन नाईक विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्यासोबत वसईतील पत्रकार परिषदेत दिसले होते. मात्र या वेळीही सोशल डिस्टनसिंगचे 'लोणचे' घातले गेल्याने भाजपची यूट्यूब पत्रकारांसोबतची ही पत्रकार परिषदही टीकेची धनी झाली होती.
त्यानंतर राजन नाईक काही खास कार्यकर्त्यांना घेऊन तिरुपती दर्शन करताना दिसले होते. या वेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांतही त्यांनी 'सोशल डिस्टनसिंग'चे नियम 'हवेत उडवून' दिल्याचे दिसले होते. दरम्यान, 'बविआमैत्री'साठी वसई-विरारकर जनतेला चार हात लांब ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्ष राजन नाईक आणि कार्यकर्त्यांना अचानक जनतेवरील अन्यायाची जाण झाल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत