डॉ. गणपतराव देशमुख यांना पद्म पुरस्कार द्या: महाराष्ट्राची मागणी
पुणे, दि. ०९ ऑगस्ट, २०२०: १९६२ पासुन अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येत विश्वविक्रम करणारे दिन-दुबळ्यांचे सोबती असलेले ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख (MLA Ganpatrao Deshmukh) यांना पद्मभुषण पुरस्काराने गौरवून त्यांच्या प्रदिर्घ समाजसेवेचा यथोचित सन्मान करावा अशी मागणी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे (Maharaja Yashwantrao Holkar Gaurav Pratisthan) अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी आणि सचिव प्रकाश खाडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.आमदार देशमुख यांनी १९७८ आणि १९९९ साली राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपदही भुषवले. सांगोलासारख्या दुष्काळी भागात त्यांनी केलेल्या विविध विकासात्मक आणि सामाजिक ऐक्याच्या महत्त्वपुर्ण कार्यामुळे तेथील जनतेने त्यांना निवडणुकांत सतत जिंकुन दिले. जनतेचे अविरत प्रेम लाभलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचा शांत व संयमी स्वभाव, कष्टकरी व शेतक-यांच्या प्रती असलेली आस्था व त्यांच्या उत्थानासाठी केलेले अविरत कार्य त्यांच्या या अभुतपुर्व यशामागे महत्वाचे कारण आहे. अशा नेत्यास पद्म पुरस्काराने सन्मानित करणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य असून ते भावी नेत्यांना प्रेरणादायी ठरेल असे मत संजय सोनवणी (Sanjay Sonavni) यांनी व्यक्त केले.
प्रकाश खाडे म्हणाले की, आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रदिर्घ काळ निस्वार्थीपणे सेवा केली. राजकारण समाजाभिमुख कसे असते हे दाखवले. पण आजवर केंद्र शासनाने त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली नाही. सांगोला तालुक्यातील व महाराष्ट्रा्मधील अनेक स्तरांतील लोकांनी आमदार देशमुख यांना पद्म पुरस्कार मिळेल अशी अनेक वर्ष वाट पाहिली. पण किमान या वर्षी तरी त्यांना पद्म सन्मान देवून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी ही समाजाची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत