आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा: प्रवीण काकडे
धनगर समाज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
कराड, दि. ०९ ऑगस्ट, २०२०: धनगर समाजाची एस. टी. आरक्षण (Dhangar S.T. Aarkshan) अंमलबजावणी त्वरित करा, त्यानंतर महाराष्ट्रात होणारी मेगा भरती लवकरात लवकर करा. या मागण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने ११ ऑगस्ट २०२० रोजी राज्यभर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे (Pravin Kakade) यांनी दिली.धनगर समाज प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी (Student) स्वयं योजेबाबत सरकार का गप्प आहे, हे समजत नाही, म्हणून धनगर समाजातील विध्यार्थ्यांच्या जात पडताळणीची (caste validity) प्रकरणे त्वरित निकालात काढावी. दुग्धोत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळावा. अहिल्यादेवी व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. धनगर समाजातील मंढपाळांना वने आरक्षित करून पास उपलब्ध करून द्यावेत, अशा आशयाचे निवेदन शासनाकडे देण्याचा हा आमचा पहिला टप्पा आहे. दरम्यान धनगर समाजाचा घोंगडी बनविणे हा एक मुख्य व्यवसाय आहे. मात्र, आज अनेक कारणांनी हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बांधवांसमोर संकट उभे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत