समाजाचे प्रश्न सभागृह बांधून सुटणार नाहीत

पोराला शाळेत शिकायला शहरात पाठवाव अन त्याने शिक्षणाऐवजी लग्नच यावं अशी गत धनगर समाजाची आज झाली आहे. नेते दिल्ली, मुंबईला पाठवायचे समाजाच्या अडचणी सोडवायला अन यांनी तिकडून यावं भलतच. आता समाजाचा खासदार दिल्लीत पाठवला होता, आरक्षण मिळवायला अन घेऊन आला सभागृह, इकडे समाजाला धनगर वाड्यांवर घर नाही, लाइट नाही, रस्ता नाही, दवाखाना नाही अन त्यांच दुखण सोडून चालले समाजगृह बांधायला, कोण सल्लागार हाय ह्यांचा देव जाने.

अरे धनगरवाड्यावर अजून लाइट, फोन, एसटी पोहचली नाही. रस्ता नसल्याने साप डसल्याने लहान पोरग मेलं, कारण रस्ताच नाही, ते काय धनगर नव्हते. ते धनगर पन्नास वर्षांपासून अंधारात राहतात, त्यांच्या नाही घरात तर दारात जरी हायमास्ट लावला असता तर त्यांच्या पोराला साप नसता चावला.


ज्या समाजाच्या नावावर आपण दिल्ली पाहली, त्यांचीच घोर प्रतारणा केली वरून जसे काही झालेच नाही. मागच्या चार पाच महिन्यात तर आरक्षणाचा शब्द सुद्धा आपल्या तोंडून ऐकला नाही. समाज तुमच्या मागे फिरला, तो काय हायमास्ट बसवायला अन सभागृह बांधायला. अन वरून १००० कोटीचे तुणतुणे ऐकवता, त्या लबाड सरकारने फक्त कागदच रंगवली, जाता जाता एक आणा सुद्धा खात्यात टाकलं नाही. म्हातारी मेल्याच दुख नाही, समाजाचे सहा वर्षे गेली तुमच्या नादी लागून, भ्रम झाला होता समाजाला, आता येथून पुढे समाज घराबाहेरच निघायचा नाही अन त्याला जबाबदार आपणच असाल.

आदिवासी पेक्षा खराब अवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांवर तुम्हाला ते दिसले नाहीत. एखादी योजना आणून त्यांच्या डोक्यावर छत दयायला किंवा झोपडीत झिरोचा बल्ब द्यायला. इकडे हायमास्ट लाऊन व सभागृह बांधून त्यांच्या जिवनात उजेड पडणार नाही. कफल्लक अवस्थेत आपले समाजबांधव जीवन जगत असताना त्यांच्या नावावर आपण चैन केली असे नाही वाटत? कारकीर्द संपायच्या आधी एकवेळ कोल्हापूरच्या त्या धनगरवाड्यावर फेरफटका मारा म्हणजे आपण त्या समाजाचे दोषी आहोत हे लक्षात येईल.

बुंदसे गयी वोह हौदसे नही आती, आता हे सभागृह बांधले काय किंवा नाही. अन हो आता उरलेल्या दिवसात काही करता आले तर फक्त आरक्षणाचेच करा, त्यावरच बोला. 

एक धनगर समाजबांधव

                                      ---------------------------------------------

The problems of the society will not be solved by building a hall

Today, it has become the norm in the society that son should be sent to the city to go to school and get married instead of getting an education. It would be better for Ann to come from there to solve the problems of the society by sending leaders to Delhi and Mumbai. Now the MP of the community was sent to Delhi, he brought the hall to get the reservation.

Light, phone, ST has not reached Dhangarwada yet. Since there was no road, the snake bit and killed the little child, because there was no road, it was not very good. They have been living in the dark for fifty years, not in their house but in the doorway, even if a high mast had been installed, their child would not have been bitten by a snake.


In the name of the society in which we saw Delhi, they were deceived. Nothing like that has happened from above. In the last four or five months, we have not even heard the word reservation. Society followed you, to build a high mast and to build a hall. Listening to rumors of Rs.1000 crore from Ann, that deceitful government only painted the paper, did not even take it into account. There is no grief after the death of an old woman. The society was deluded by your nadi six years ago. The society does not want to go out of the house from now on and you will be responsible for it.

The situation is worse than the tribals. You have not seen it on Dhangarwadas in Kolhapur district. Bring a plan to cover their heads or give them a zero bulb in the hut. Building a high mast lounge and hall here will not shed light on their lives. Don't you think that you have made peace in the name of your community members while they are living in Kafallak? Take a walk around that Dhangarwada in Kolhapur before the end of your career and you will realize that you are the culprit of that community. 

Bundse gayi woh houdse nahi aati, now this hall is built or not. On the other hand, if you can do anything for the rest of the day, just make a reservation, talk about it. 

A very social brother

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.