ब्लडप्रेशर आणि नियंत्रण

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील. 


लसूण -
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी. 

शेवगा - यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रभाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे. 


जवस -
जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे की, ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. 

विलायची - एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शरीराला अँटीऑक्सीडेंट मिळतात तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 

आवळा - दररोज आवळ्याचे सेवन केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते. 

दालचिनी - दालचिनीच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर दालचिनी आपला रक्तप्रवाह नियमित ठेवते. 


मुळा -
ही एक साधारण भाजी आहे. मुळा खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. मुळ्याची भाजी करून किंवा कच्चा खाल्ल्यास शरीराला मिनरल्स आणि योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते. 

कांदा - कांद्याच्या नियमित सेवनाने कॉलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामध्ये क्योरसेटिन नावाचे तत्त्व असते, जे हृदयाच्या आजारांपासून आपले रक्षण करतो.  

डॉ. श्री. नितिन जाधव
संजीवन चिकित्सक, डोंबिवली
9892306092.

 
                                                    ----------------------------------

Bloodpressure and control 

The number of patients with high blood pressure is increasing day by day. Due to the fast food and irregular routine in the stressful life, the disease is also seen in large numbers in India. Blood pressure can lead to heart disease and stroke. Patients with high blood pressure need to take medication every day. Today we are going to inform you about some home remedies. If you also suffer from high blood pressure, you must try these home remedies. These measures will keep your blood pressure under control.

Garlic - Garlic is a nectar-like medicine for patients with high blood pressure. It contains a substance called allicin, which increases the levels of nitric oxide and relaxes your muscles. Relieves the diagnostic and systolic functioning of blood pressure. This means that patients with high blood pressure must eat a clove of garlic every day.

Shevaga - It is rich in protein and vitamins as well as mineral salts. According to a research, drinking the extract of the leaves of this plant has a positive effect on the dialistic and systolic functioning of blood pressure. Patients with high blood pressure should consume sugarcane along with lentils.

Flaxseed - Flaxseed is rich in alpha linolenic acid. It is a type of important omega-3 fatty acid. Various researches have shown that people who suffer from hypertension should use flaxseed in their diet. It lowers cholesterol and helps control blood pressure.


Vilayachi -
According to a research, regular consumption of vilayachi keeps blood pressure in check. Its intake provides antioxidants to the body and keeps the blood flow smooth.

Amla - Daily consumption of amla helps in controlling blood pressure. Amla contains Vitamin C. This keeps the blood flow smooth and also keeps the cholesterol under control.

Cinnamon - Cinnamon consumption helps in controlling blood pressure. Not only that, but cinnamon keeps your blood flow regular.

Radish - This is a simple vegetable. Eating radish keeps blood pressure under control. Eating raw vegetables or eating them raw gives the body minerals and the right amount of potassium.

Onion - Regular consumption of onion helps in controlling cholesterol. It contains a substance called quercetin, which protects you from heart disease.

Dr. Mr. Nitin Jadhav
Sanjeevan Physician, Dombivali
9892306092.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.