आदिवासींप्रमाणे धनगर समाजातील गरिबांना खावटी अनुदान दयावे- दत्ता वाकसे

बीड, दि. १६ ऑगस्ट, २०२०: मागील सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व योजना लागू केल्याची घोषणा केली होती व तसे आदेश सुद्धा काढले होते. परंतु या सरकारने आदिवासीप्रमाणे योजना लागू केल्या होत्या व त्या तात्काळ सुरू कराव्यात. सध्या सुरू असलेल्या करोना महारोगराईमुळे रोजगाराची मोठी अडचण निर्माण झाली असून अनेकांचा रोजगार सुद्धा गेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजातील विवंचनेत जिवन जगणाऱ्या साडे अकरा लाख आदिवासी बांधवाना रु. चार हजार खावटी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर निर्णय धनगर समाजातील दारिद्रय रेषेखालील नागरिक, भूमिहीन, विधवा परित्यक्ता यांना सुद्धा देण्यात दयावा असे निवेदन धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी ईमेलद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. मंत्री. भटके विमुक्त, ओबीसी यांना पाठवले आहे. करोना व लाॅकडाउनमुळे धनगर समाजातील हा वंचित घटक रोजगार बुडाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे धनगर समाज हा आदिवासीच्या पलिकडे दारिद्र्यात जगत आहे, त्यामुळे सरकारने आदिवासी समकक्ष म्हणून धनगर समाजातील पात्र व्यक्तींना सदर खावटी अनुदान योजना त्वरित लागू करावी अशी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे त्यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे सादर केले आहे.
 
----------------------------------

Khawti grants should be given to the poor of Dhangar community like tribals- Datta Wakse 

Beed, Dt. August 16, 2020: The previous government had announced the implementation of all tribal schemes for the Dhangar community in Maharashtra and issued similar orders. But this government had implemented schemes like the tribals and they should be started immediately. The ongoing Corona leprosy has created a major employment crisis and many have lost their jobs. In this connection, the Government of Maharashtra has provided Rs. 11.5 lakh to the tribals living in poverty. It has been decided to distribute four thousand khawti grants.

This decision should also be given to the citizens below the poverty line in Dhangar Samaj, landless, widows and abandoned people. Chief Minister, Hon. Deputy Chief Minister and Hon. Minister. Bhatke has been sent to Vimukta, OBC. Due to corona and lockdown, this deprived section of the Dhangar community has been found to be in dire financial straits due to loss of employment. So the Dhangar community is living in poverty beyond the tribals, so Datta Wakse, Beed district chief of Dhangar Samaj Sangharsh Samiti, has submitted an email statement to Chief Minister Uddhavji Thackeray urging the government to immediately implement the scheme.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.