आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या: जनतेच्या मनातलं त्याचं स्थान अढळ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई, दि. १६ ऑगस्ट, २०२०: माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जाऊन पाच वर्षें झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिस भरती, भ्रष्टाचारमुक्त करुन हजारो युवकांना दिलेली संधी, यामुळे राज्यातील जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आदरांजली वाहिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाले की, आर. आर. आबा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते. आम्हां सर्वांचे मित्र, सहकारी होते. अत्यंत गरीब कुटुंबातून येऊनही गुणवत्ता, कठोर परिश्रम, पक्षनिष्ठेच्या बळावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचता येतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं. जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक पदावर स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला. आर. आर. आबांचं जीवन हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आर. आर. आबांना आदरांजली वाहिली.
 
-----------------------------
 
R. R. (Aaba) memories are fresh: his place in the minds of the people remains unshakable - Tribute to Deputy Chief Minister Ajit Pawar
 
Mumbai, Dt. August 16, 2020: Former Deputy Chief Minister, the beloved leader of all, the late R. R. Even though it has been five years since my (Aaba) passed away, his memories are still fresh in the minds of NCP workers and the people. The Gram Swachhta Abhiyan, Tantamukti Abhiyan, his decision to ban dance bars, police recruitment, opportunities given to thousands of youths by freeing them from corruption, has made their place in the minds of the people of the state unwavering. In such words, Deputy Chief Minister Ajit Pawar R. R. (Aaba) On the occasion of his (Aaba)  birthday, he greeted and paid homage.
 
Deputy Chief Minister Ajit Pawar R. R. Elaborating on his (Aaba's)  memories, he said, "R. R. Aba was a prominent leader of the NCP. We were all friends, colleagues. He had proved that even from a very poor family, one can reach the post of Deputy Chief Minister of the state on the strength of quality, hard work and party loyalty. He did justice to every responsibility entrusted to him as a member of Zilla Parishad, MLA, Minister, Deputy Chief Minister. Each post made its own mark. R. R. Aab's life is an inspiration, a guide for millions of youth in rural Maharashtra, said the Deputy Chief Minister. R. I paid homage to my father.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.