सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच; किंमत १९,९९९ ₹
जगभरात स्वस्त किंमतीत फीचर फोन आणि एलईडी टीव्ही लाँच करणाऱ्या कंपनीने आता भारतात खूपच स्वस्त किंमतीची दुचाकी लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत केवळ १९ हजार ९९९ रुपये आहे.
नवी दिल्ली, दि. १५ ऑगस्ट, २०२०: जगात सर्वात स्वस्त फीचर फोन केवळ २९९ रुपयांत घेऊन आलेली कंपनी तसेच स्वस्त किंमतीचा एलईडी टीव्ही ३९९९ रुपयात लाँच करणारी प्रसिद्ध स्टार्ट अप कंपनी Detel ने आता कमी किंमतीत टू व्हीलर Detel Easy (डेटेल ईजी) लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की, जगात सर्वात स्वस्त किंमतीची आणि विश्वासू बाईक आहे.
किंमत
डेटेल ईजी ची किंमत १९ हजार ९९९ रुपयात (जीएसटीसह) ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही केवळ खरेदीसाठी स्वस्त आहे. परंतु, चालवण्यासाठी या बाईकला खूप कमी खर्च येणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून ही बाईक खरेदी करता येवू शकते.
बॅटरी
Detel Easy टू व्हीलर मध्ये ६ पाईप नियंत्रित 250W इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. दुचाकी उलेक्ट्रिक वाहनाची स्पीड २५ किलोमीटर प्रति तास इतका आहे. डिटेल ईजी 48V 12A LifePO4 बॅटरी दिली आहे. या बॅटरीला ७ ते ८ तासांत फुल चार्ज केले जावू शकते. फुल चार्ज झाल्यानंतर बाईक ६० किलोमीटर पर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
लायसन्सची गरज नाही
या बाईकचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला चालवण्यासाठी लायसन्सची गरज नाही. तसेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची गरज नाही.
हेलमेट फ्री
नवीन लाँच करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन सिस्टमनुसार यात ड्रम ब्रेक दिले आहेत. कंपनी प्रत्येक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हेलमेट फ्री मध्ये देत आहे. कंपनीने ही बाईक तीन रंगात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅटलिक रेड या रंगात उपलब्द केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत