जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा- दत्ता वाकसे
बीड, दि. २२ ऑगस्ट, २०२०: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्वांना गणेशोत्सवाची आतुरतेने प्रतिक्षा लागलेली आहे. परंतु महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशावर करोनासारख्या महारोगाने थैमान घातलेले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिलेली आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये करोनाचे पेशंट दिसत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत सर्वच झालेल्या सण उत्सवावर निराश व्हावे लागले आहेत. परंतु सर्व गणेश भक्तांचा विचार करून शासन प्रशासनाने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यासाठी महत्त्वाचे काही निष्कर्ष बंधनकारक केलेले आहेत.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आलेल्या माहितीनुसार श्रीगणेशाची मूर्ती केवळ चार फुटाच्या आसपास असावी. सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणेश मूर्तीची आरती करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, मंडप परिसरात गर्दी करू नये, वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करावी, कुठल्या प्रकारचे देखावे करू नये. जसे की नाटक या विविध प्रकारचे कला उत्सव करू नये. त्याचबरोबर गणेश मूर्तीची आरती करताना केवळ पाच व्यक्ती उपस्थित असावेत. या सर्व अटी घातल्या असून आपण सर्वांनी गणेश भक्तांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व प्रशासनाच्या नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील, देशातील करोना रोग पळून लावण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत