प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या प्रयत्नाला यश, देवनार पशुवधगृह येथील बाजारपेठ ८ दिवसात होणार सुरू: महापौर किशोरी ताई पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

 


मुंबई, दि. २१ ऑगस्ट, २०२०: मुंबई येथील देवनार पशुवधगृह येथे आशिया खंडातील सर्वात मोठा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. या बाजारपेठेवर जवळपास १० हजार कुटुंबाची उपजीविका चालते, परंतु गेल्या ५ महिन्यांपासून करोनाच्या नावाखाली ही बाजारपेठ बंद ठेवलेली होती. यामुळे त्या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झालेली होती. या सर्व प्रकारामुळे व्यथित होऊन शेळी-मेंढी संघटनांच्या व्यक्तींनी ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी देवनार पशुवधगृह येथे आंदोलन करून ८ दिवसात ही बाजारपेठ सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. याची मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेऊन शेळी-मेंढी संघटनांचे सदस्य, व्यापारी व प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे निर्देश महापौरांना दिले होते त्यानुसार महापौर दालनात किशोरी ताई पेडणेकर यांनी बैठक बोलावली होती.

या बैठकीत सोशल डिस्टसिंगचे पालन करून येत्या ८ दिवसात ही बाजारपेठ सुरू करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना किशोरी ताई पेडणेकर यांनी दिले.

प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या प्रयत्नामुळे ही बाजारपेठ येत्या ८ दिवसात सुरु होत आहे. यामुळे जवळपास १० हजार कुटुंबाची रोजीरोटी परत सुरू होणार आहे. निर्णयानंतर मुस्लिम व्यापारी व दलाल संघटनांचे प्रतिनिधी, मेंढपाळ कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच समस्त धनगर समाजाने प्रकाश (आण्णा) शेंडगे यांनी अथक परिश्रम करून न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

या निर्णयानंतर प्रकाश (आण्णा) शेंडगे यांनी असे सांगितलं की, मी कायम मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार आहे. तसेच त्यांनी सर्व मेंढपाळांना, कामगारांना सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला महापौर किशोरी ताई पेडणेकर, ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश आण्णा शेंडगे, बेस्ट समिती अध्यक्ष तथा जेष्ठ नगरसेवक अनिल पाटणकर, स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे, महानगरपालिका सह आयुक्त (विशेष) आनंद-वागराळकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)  संजीव जयस्वाल, महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृह  डॉ. योगेश शेट्ये यांच्यासह, मेंढपाळ कामगारांचे प्रतिनिधी म्हणून शहाजी झिंजे, भास्कर शेजाळ, तुकाराम दुधाळ, बापू दुधाळ, राजू चौगुले हे उपस्थित होते. तर दलाल व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून तन्वीर पटेल, शहाजीत मकसूद, अब्दुल रेहमान, मुनीर बशीर, कय्युम कादर इत्यादी उपस्थित होते.

या निर्णयानंतर बैठकीत प्रकाश (आण्णा) शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महापौर किशोरी ताई पेडणेकर, जेष्ठ नगरसेवक तथा बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, स्थानिक नगरसेवक विट्ठल लोकरे यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.