पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्याकडून सोनकसवाडीत निधीतुन कामास सुरुवात

पुणे, दि. २१ ऑगस्ट, २०२०: सोनकसवाडी येथे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी रविराज तावरे (लाखे)यांच्या निधीतून (१४ लक्ष) नुकत्याच दुरुस्ती करण्यात आलेल्या सोनकसवाडी पाझर तलावामध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्याचे जलपूजन आणि रोहिणी ताई तावरे यांच्या जिल्हा परिषद निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सोनकसवाडी येथील नवखंडेनाथ मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या पाच लक्ष रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या शुभहस्ते व सोनकसवाडीचे सरपंच बापूराव कोकरे, युवा नेते रविराज तावरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सणस, राजेंद्र कोकरे, विजय फाळके सर, जनार्दन गायकवाड, मंगेश कोकरे, सुरेश कोकरे, शिवाजी पवार, दत्तात्रय सणस, धनाजी मोहिते, संजय शिंदे, सतोष लोखंडे, महादेव फाळके, अनिल बनकर, सागर भापकर, सतोष सणस, गणेश शेलार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.
सरपंच बापूराव दौलतराव कोकरे यांनी या दोन्ही योजनासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याबद्दल सोनकसवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.