पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटरचे भूमीपूजन
अहमदनगर, दि. १५ ऑगस्ट, २०२०: राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय आवारातील सखी वन स्टॉप सेंटरचा भूमीपूजन सोहळा पार पडला. महिलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, लवकरच ते स्वतःच्या इमारतीत स्थानांतरित होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि केंद्र पुरस्कृत या सेंटरच्या भूमीपुजन प्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनीलजीत पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने-खरात, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅ़ड. भूषण बर्हाटे आदींची उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाद्वारा प्रकाशित हुंडाबंदी अधिनियमाची माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सध्या हे वन स्टॉप सेंटर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत सुरु आहे. लवकरच ते स्वतःच्या जागेत स्थलांतरित व्हावे, त्यादृष्टीने वेळेवर काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, अनिता माने शाखा अभियंता श्रीपाद भागवत, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचे खेडकर, पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे, संजय सांगळे, संध्या राशीनकर, वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापक प्रियंका सोनवणे, प्रसाद शेळके, अमोल वाघमोडे, वैभव देशमुख, सर्जेराव शिरसाठ, वनिता गुंजाळ, प्रशांत गायकवाड, बाळासाहेब साळवे, अनिल गावडे, संजय चाबुकस्वार, प्रकाश वाघ, जुनैत शेख आदींची उपस्थिती होती.-------------------------------------
Bhumi Pujan of Sakhi One Stop Center at the hands of Guardian Minister Hasan Mushrif
Ahmednagar, Dt. August 15, 2020: Bhumi Pujan ceremony of Sakhi One Stop Center was held at the hands of District Rural Development Minister and District Guardian Minister Hasan Mushrif today. The center will play an important role in the process of giving justice to women, he said, adding that it will soon be shifted to its own building.
MLA Sangram Jagtap, District Collector Rahul Dwivedi, District Legal Services Authority Secretary Suniljit Patil, District Superintendent of Police Akhilesh Kumar Singh, District Surgeon Dr. Sunil Pokharna, District Women and Child Development Officer Vijaymala Mane-Kharat, President of Ahmednagar Bar Association Adv. Bhushan Barhate and others were present.
On this occasion, the Guardian Minister Mushrif released a booklet on the Dowry Prohibition Act published by the Department of Women and Child Development. Currently, this One Stop Center is operating in the space of Public Works Department. Guardian Minister Hasan Mushrif hoped that they would relocate to their own place soon and work would start on time. Snehalaya's Girish Kulkarni, Anita Mane Branch Engineer Shripad Bhagwat, Integrated Tribal Development Project's Khedkar, Police Inspector Harun Mulani, Traffic Branch Police Inspector More, Sanjay Sangle, Sandhya Rashinkar, One Stop Center Manager Priyanka Sonwane, Prasad Shelke, Amol Waghmode, Vaibhav Deshmukh , Sarjerao Shirsath, Vanita Gunjal, Prashant Gaikwad, Balasaheb Salve, Anil Gawde, Sanjay Chabukaswar, Prakash Wagh, Junaid Sheikh and others were present.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत