धनगर समाजातील मेंढपाळाच्या लोकरीकरीता शासकीय खरेदी केंद्र सुरू करा- दत्ता वाकसे
बीड (प्रतिनिधी), दि. १८ जुलै, २०२०: महाराष्ट्रातील धनगर समाजातील मेंढपाळाच्या मेंढीच्या लोकरीला राज्यशासनाने लोकरीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करुन व त्याच बरोबर शासकीय जागेच्या ठिकाणी लोकर साठविण्यासाठी गोदाम बांधण्यात यावेत अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले धनगर समाजाच्या मेंढपाळांचा वंशपरंपरागत व्यवसाय मेंढी पालन असून हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मेंढ्यापासून मिळणारे मुख्य उत्पादन लोकर असून या लोकरीचे शासकीय खरेदी केंद्र नसल्यामुळे जुन, व जुलै, महिन्यात निघणारी लोकर फेकून द्यावी लागते. या लोकरीपासून तयार होणाऱ्या घोंगडीचा उपयोग वात, अस्थमा, हाडामधील गँप अशा प्रकारच्या आजारावर असणारे रुग्ण मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या घोंगडीकडे राज्यशासन दुर्लक्ष करीत आहे.
ही लोकर साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे जिल्ह्यातील ठिकाणी शासकीय गोदाम बांधून देण्यात यावेत जेणेकरून खरेदी केंद्र सुरू करावेत. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळाना शासकीय खरेदी केंद्र सुरू केले तर उपयुक्त असणारी लोकर बाहेरून येणारे व्यापारी येतात आणि २० रुपये प्रति किलो व बेभाव लोकरीची मेंढपाळांकडून खरेदी करून खासगी उद्योजकांना उच्च दरामध्ये पुरवठा करुन देतात. यामध्ये सुध्दा मेंपाळांची मोठ्या प्रमाणात लुट केली जाते. सदर लोकरीचा फायदा व्यापाऱ्यांना होतो. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळाकडून थेट खरेदी केंद्रामार्फत ३०० रुपये प्रति किलो भावाने खरेदी करुन रानोमाळ फरफटत डोंगरद-यात भटकंती करणाऱ्या राज्यातील मेंढपाळाना न्याय मिळवून देण्यात यावा असे देखील धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत