युरियाचा साठेबाजार कराल तर याद राखा- दत्ता वाकसे

बीड, (प्रतिनिधी), दि. १८ जुलै, २०२०: संपूर्ण महाराष्ट्रभर आणि बीड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले, त्यामुळे बळीराजा अतिशय सुखावलेला आहे. परंतु काही कृषी केंद्रधारक व दुकानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची युरिया खताच्या बाबतीमध्ये मेटाकुटी होताना दिसत आहे. आगामी शेतकऱ्यांची जर का युरिया खतामुळे गळचेपी केली जात असेल. तर याद राखा जशास तसे उत्तर देऊ अशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की आजमितीला संबंध  राज्यावर नव्हे तर देशावर खूप मोठे करोनासारखे महाभयंकर रोगाने थैमान घातलेले असताना सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले जाते.

शेतकरी हा जगला तर जगेल ही परिस्थिती असताना कृषी केंद्रांकडून व कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुकानदारांच्या गोडाउनमध्ये युरिया खताचा साठा असतानादेखील खत दिले जात नाही. योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना युरिया दिला नाही तर कृषी केंद्र धारकांना जशास तसे उत्तर देऊ असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे. शेतकरी हा अगोदरच बँकांनी योग्यवेळी पीक कर्ज न दिल्यामुळे अतिशय त्रस्त आहे व सावकाराकडून कर्ज काढून शेतकरी हा शेतीची काळ्या आईची ओटी भरत असतो. परंतु काही कृषी सेवा केंद्र व कृषी दुकानदार खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून युरिया खतांमध्ये लूट करताना दिसत आहेत याबाबत जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आता शेतकरी वर्गातून बोलली जात आहे. त्याचबरोबर जर का योग्य पद्धतीने शेतकरी बांधवांना युरिया खत वाटप नाही केला तर कृषी दुकानदार व कृषी सेवा  केंद्र धारकांना जशास तसे उत्तर देऊ असे देखील त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.