मेंढपाळ बांधवावरील हल्‍ले महाराष्‍ट्रासाठी भुषणावह नाहीत!

पराक्रम व साहस यांचे कोंदन लाभलेली आपली धनगर जमात ऐकून छान वाटतय ना! पण सध्‍या आपली धनगर जमात अन्‍यायाखाली दबली आहे, मला माफ करा मी जरा जास्‍तच बोलतोय. पण जे उघड्‍या डोळ्‍यांनी दिसतय तेच सत्‍य मानायची सवय आहे. भूतकाळचा इतिहास पाहिल्‍यास रणांगणावर तलवार चालविणारी माझी पराक्रमी जमात पण सध्‍या स्‍वत:चेच रक्षण करण्‍यास असमर्थ आहे असे वाटते.

आज आपल्‍या धनगर जमातीमधील मेंढपाळ बांधवांवर जीवघेणे हल्‍ले अगदी राजरोसपणे होत आहेत. हल्‍ले करणार्‍यांना आपण लोकशाहीप्रधान देशात राहतो आहोत याचेही भान नसावे हीच शोकांतिका आहे. संविधान स्वीकारलेल्‍या आपल्‍या देशात कायद्‍याचे राज्‍य आहे हे सत्‍य पण इतके मोठे सत्‍यही हे "हल्‍लेखोर"कसे काय विसरतात याचेच नवल वाटते.

मेंढपाळ बांधवावर होणारे हल्‍ले पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी नक्‍कीच भुषणावह नाहीत. जमातीचा कायद्‍यावर विश्‍वास आहे. त्‍यामुळे मा. मुख्‍यमंञी साहेबांनी या विषयात लक्ष घालून मेंढपाळ बांधवांना न्‍याय द्‍यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. वारंवार मेंढपाळ बांधवावर होणारे हल्‍ले  थांबविण्‍यासाठी महाराष्ट्र राज्‍य सरकारने कायमस्‍वरुपी कायदा करण्‍याची गरज आहे.

सुरेश बिरु रानगे,
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, कोल्‍हापूर,
महाराणी अहिल्‍यादेवी समाज प्रबोधन मंच, मुबंई, महाराष्ट्र.
९८३४२२८५०३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.