मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अँट्रॉसिटीसारखा कडक कायदा करा
धनगर समाजाचे नेते अभिजित देवकाते-पाटील यांची शासनाला मागणी
बारामती, दि. १२ जुलै, २०२०: धनगर मेंढपाळ बांधवावर होणारा अन्याय रोखण्यासाठी अॅट्रॉसिटीसारखा कडक कायदा अंमलात आणावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते अभिजित देवकाते-पाटील यांनी केली आहे. धनगर मेंढपाळांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात अभिजित देवकाते-पाटील व कार्यकर्त्यानी बारामती तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरची मागणी करण्यात आली आहे. मेंढपाळ धनगरबांधव आपल्या उपजिविकेसाठी घरदार सोडून महाराष्ट्राभर रानावनात, दऱ्याखोऱ्यात वणवण भटकत असतो. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत आपला व आपल्या मेंढरांचा उदरनिर्वाह करीत असतो.

अशा वाईट परिस्थितीमध्ये जात असताना काही समाज कंटकाकडून वारंवार त्यांच्यावर अत्याचार व हल्ले केले जातात आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही अथवा मुद्दाम दिरंगाई केली जाते. त्यामुळे समस्त धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे नेते अभिजित देवकाते-पाटील यांनी प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे की, धनगर मेंढपाळ बांधवावर होणारा अन्याय रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी सारखा कडक कायदा अंमलात आणावा तसेच मेंढीपाळाला शस्त्र परवाना द्यावा, जेणेकरून दिनदुबळ्या आणि परिस्थितीनी व्याकुळ झालेल्या समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी थोडी फार मदत होईल व समाजकंटकांच्या मनामध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, असे देवकाते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत