मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

रेखाताई देवकाते-पाटील यांनी घेतली पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट

हिंगोली, दि. १२ जुलै, २०२०: हिंगोली जिल्हा शिवसेना तथा धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या जिल्हाप्रमुख रेखाताई देवकाते पाटील यांनी मेंढपाळ बाधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहेत. धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम, सरसेनापती प्रकाश भैया सोनसळे, प्रदेश अध्यक्ष विनोद अण्णा खेमणार यांच्या आदेशावरून दिनांक १० जुलै रोजी हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात हिंगोली जिल्हा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना मेंढपाळ बाधवांवर होणारे हल्ले व इतर समस्या सोडविण्यासाठी व सध्या प्रशासनाने गावपातळीवर गायरान जमिनीवर वृक्षलागवड करीत असताना आमच्या मेंढपाळ बांधवांसाठी काही जागा शिल्लक ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सहसरचिटणीस भाजी देवकते पाटील, मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, संपर्क प्रमुख तरडे, मराठवाडा सरचिटणीस राजू रवने, प्रसिद्धीप्रमुख शिवाजी गडदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गंगाप्रसाद खारोडे, महिला प्रतिनिधी प्रणीताताई धुळगुंडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पावडे, उपाध्यक्ष यशवंत पाबळे, महिला जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते पाटील, उपाध्यक्षा सारीकाताई चांदणे, ईमडेताई, कुरूडेताई, कैलास चांदणे, कळमनुरी तालुका अध्यक्ष विलास मस्के, वसमत तालुका अध्यक्ष गजानन माटे, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष शंकर आळसे, आमचे मार्गदर्शक शिवाजी पातळे, हिंगोली तालुका अध्यक्ष स्वातीताई पातळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.