जातीय तेढ निर्माण करणाऱ्या टिक टॉकवर बंदी आणा-दत्ता वाकसे

बीड/प्रतिनिधी, दि. १९ जून, २०२०: आजमितीला मनोरंजनाचं म्हणून टिक टाँक खूप प्रसिद्ध झालेला आहे, परंतु त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जातीय निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीची आढावा घेऊन राज्यातील सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी टिक टॉकवर बंदी आणावी आणि त्याच बरोबर काल-परवा भारतीय जवानावर हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून प्रत्येक नागरिकाने टिक टॉक वापरणे बंद करावे
यामुळे देशाला खरोखरच देशाच्या सैनिकाला आदरांजली म्हणून सर्व भारतवासीयांना आगामी काळामध्ये टिक टॉकचा वापर न करता निषेध करून डिलीट करावा. त्याचबरोबर आजपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टिक टॉकमुळे छातीमध्ये निर्माण होत आहेत कोणी काही गैरवापर करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे माननीय या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तात्काळ टिक टॉकवर बंदी घालावी. धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. पुढे ते म्हणाले की, तरुण पिढी ही आपला पूर्ण वेळ हा त्याच्यामध्ये गंमत आहे, त्यामुळे करियरकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या टिक टॉकसारखे  चिनी ॲपवर तात्काळ बंदी घालावी आणि यामुळे होणारे जातीय तेढ तेदेखील होणार नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये टिक टॉक ॲपवर तात्काळ महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी अशी देखील त्यांनी दिलेले प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.