महादेव जानकर: एक ध्येयवादी व्यक्तिमत्व
डॉ. संगीता चित्रकोटी
संपर्क: sangitachitrakoti@gmail.com
मोबा.: ९४२१९०५५९९
आपल्या सर्वांचे लाडके माजी पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री मा. ना. महादेव जानकर साहेब त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण. वर्षानुवर्षे भटकंती करणाऱ्या, दऱ्याखोऱ्यात जीवन कंठणार्या शोषित, उपेक्षित, वंचित धनगर जमातीची दयनीय अवस्था पाहून जानकर साहेबांचे मन व्यथित झाले. फक्त धनगरच नाही तर सर्व दुर्लक्षित, शोषित, अन्यायग्रस्त बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. आपल्या निश्चयाला कृतीची जोड दिली. हल्लीची तरुणाई नोकरी, घर, संसार यात रमतात. पण महादेव नावाच्या तरुणाने ऐन तारुण्याचा काळ समाजास देण्याचा पण केला. एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेल्या ध्येयवेड्या या तरुणाने आपल्या घरादाराचा ट्याक्स केला. स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही. अनुभवाची शिदोरी मिळविण्यासाठी स्वतः भटकंती सुरु केली. कारण जीवनाच्या प्रवासात अनुभव खूप काही शिकवून जातात. अनुभव मोठा गुरु असतो. भटकंती करताना हि मी समाजाच काहीतरी देणं लागतो हि भावना त्यांना गप्प बसू देत नव्हती म्हणूनच त्यांनी समाज कल्याणाचे व्रत हाती घेतले. जवळ जवळ पंचवीस वर्ष अविरतपणे ते समाजातील वंचित व शोषित वर्गासाठी झटत आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वांशी असलेले स्नेहाचे संबंध, समाजाचे प्रेम, ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर ते कॅबिनेट मानती झाले. पण मोठेपणाचा कधी आव आणला नाही. घेतला वास टाकला नाही. 'साधी राहणी उच्च विचार' हे सूत्र त्यांनी अवलंबिले. आर्थिक दृष्टया गरीब पण मानाने श्रीमंत अशा कार्यकर्त्याच्या घरी हक्काने जाणारा आणि त्यांच्याकडे चटणी भाकरी आवडीने खाणारा महाराष्ट्रातील एकमेव मंत्री असावा.
कॅबिनेट मंत्री झाल्यावर मिळालेल्या खात्याचा सूक्ष्म अभ्यास केला. विविध शासकीय योजना निमार्ण करून समाजातील तळागाळापर्यन्त पोहचविण्याचे काम त्यांनी केले. साधारण दीड वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या उरण जेटी उदघाटन प्रसंगी मा. नितीन गडकरीसाहेब म्हणाले होते कि, "पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास खाते महादेव जानकार यांनी भरभराटीस आणले आहे." यावरून सिद्ध होते कि, भूमिका कोणतीही मिळो आपली भूमिका चोख वठवत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविण्याचे कसाब जातिवंत कलाकाराकडे असतेच.
नेता कधी कोणत्याही विशिष्ट सीमीत समाजासाठी काम करत नसतो. "बहुजन हिताय बहुजून सुखाय" कार्य असते. मा. महादेव जानकर हि असेच निष्ठावंत नेता आहेत. खरं तर ते स्वतःला कार्यकर्ताच मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा कार्यकर्त्याना 'devoted workers' असा शब्द प्रयोग करीत. बाबासाहेबांच्या या विचारांचा वारसा जानकरसाहेब जपत आहेत. अनेकदा विरोधांकडून साहेबांचा अपप्रचार केला गेला. पण साहेब विरोधकांच्या वादळात हि स्थितप्रज्ञ राहिले. प्रत्युत्तर देण्यापेक्षा "परहित सामान धर्म नहीं कोय" या उक्तीप्रमाणे काम करत राहिले.
राष्ट्रीय समाज पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर या विभूतींच्या विचारांनी प्रेरित झालेले पक्ष आहे. खरा पक्ष आणि खरा नेता तोच जो कोणत्या मार्गाने जायचं हे जाणतो. गेली १५ वर्ष रासप संपूर्ण भारतात शोषित वंचित उपेक्षित, दुर्लक्षित अशा 'आम आदमी'साठी काम करतोय. अन्यायाला वाचा फोडतोय. कार्यकर्ते स्वतः तन मन धन अर्पून निष्ठेने काम करत आहेत. रासपच्या मावळ्यांनो पक्षाला आणखी उंचीवर नेण्यासाठी 'knowledge based leadership ' पद्धतीने काम करायचे आहे. कारण अशी लीडरशीप समाजातील मोठ्या परिवर्तनाचा पाया रचतात. आपले यश आपल्या हातात आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत