शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना; पडळकरांची जीभ घसरली
महाराष्ट्र टाइम्स, पंढरपूर, दि. २४ जून, २०२०: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका केली. शरद पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहाला भडकवण्याचे काम केलं आहे, असं सांगतानाच शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर पडळकरांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगत भाजपने या विधानावरून हात झटकले आहेत.
पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असं सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली.
पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू, असं सांगतानाच करोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं. पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू, असं सांगतानाच करोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं. पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपने हात झटकले आहेत. शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. त्यांचं राजकारण आणि विचारधारेशी आम्ही असहमत आहोत. पण पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत पडळकरांनी असं विधान करायला नको होतं. पवारांबाबत पडळकरांनी केलेलं विधान चूक असून भाजप त्यांच्या विधानाशी सहमत नाही, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं. त्यामुळे पवारांवरील विधानावरून पडळकर हे भाजपमध्ये एकटे पडले आहेत. भाजपकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतरही पडळकर यांनी कोणताही खुलासा केलेला नाही किंवा दिलगीरीही व्यक्त केलेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकर यांच्या विधानाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पडळकर यांच्या या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत