प्रविण काकडे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी- जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी

कोल्हापूर, दि. २५ जून, २०२०: कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्यावतीने प्रविण काकडे यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष तर काहींशी फोनद्वारे चर्चा करून पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेब , आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील तसेच आमदार राजूबाबा आवळे यांना शिष्टमंडळ भेटून  लेखी निवेदन दिले आहे. अशी माहिती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शंकरराव पुजारी यांनी दिली आहे. धनगर समाजाच्या राज्यभर विविध संघटना कार्यरत असून संपूर्ण देशभर कार्य करणाऱ्या "ऑल इंडिया धनगर समाज महासंघ" दिल्ली ,या संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रविणजी काकडे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे संधी देण्यात यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
धनगर समाजातील सर्व स्तरावर त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. भुदरगड तालुक्यातील लिंगडीचा धनगर वाडा येथील विठ्ठल रामू बाजारी यांच्यावर जंगली गवा रेड्याने हल्ला करून त्यांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त केले अशा वेळी त्यांच्या वाडयावस्तीवर जाऊन आर्थिक मदत करून आणि त्यांच्या 7 मुलींना शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेणारे तसेच आतापर्यंत १२००हुन अधिक मुलांना त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. विविध ठिकाणी वस्तीगृहात असणारे व महाविद्यालयात शिकणाऱ्या धनगर समाजातील हुशार गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करून अनेकांना मदत करणारे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे समाजातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून लोकप्रिय बनत गेले. धनगर समाजाच्या आरक्षण लढाईत चळवळीत संपूर्ण देशभर आणि राज्यात अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे समाज जागृती केली. न्यायालयीन लढाईसाठी चालू असलेल्या चळवळीला गट तट  न पाहता पाठिंबा दिला हे सर्व कार्य करताना त्यांनी कोणत्याही पक्षाचे लेबल लावले नाही. प्रविण काकडेसरांचे हे कार्य नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य संघटनेच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात सुरू आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, गोवा अशा ठिकाणी त्यांनी आपले कार्य करत आहेत. महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर विविध ठिकाणी कार्य करणाऱ्या प्रविण काकडेसरांच्या कार्याची सुरुवात १९९७ पासून झाली आहे.
आजपर्यंत कार्यरत असणाऱ्या त्यांच्या कार्याला सलाम करायला पाहिजे म्हणूनच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोर धरू लागली आहे. निवेदनामध्ये धनगर समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील नेते एकत्र  आले आहेत. त्यामध्ये  प्रा. राजेंद्र कोळेकर, ओंकार कोळेकर, (पन्हाळा), सचिन पुजारी, काशिनाथ पुजारी (हातकणंगले), महादेव लांडगे, तानाजी लांडगे, आनंदा करपे, प्रविण करपे (करवीर), उद्योगपती निवास वाटेगावकर (कोल्हापूर), प्रा. मंगेश हजारे, अनिल हजारे (कागल), नेमिनाथ पुजारी, अजय हराळे (शिरोळ) तसेच इतर अनेक समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.