मेंढपाळाचा मृत्यू, आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी…

करमाळा, दि. २४ जून, २०२०: रावा भिवा नरुटे या मेंढपाळावरती मेंढ्या चारत असताना करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात येथे एका व्यक्तीने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या रावा भिवा नरुटे यांचा उपचार सुरु असताना 1 वर्षानंतर मृत्यू झाला. त्यामुळं संतप्त झालेल्या धनगर समाजाने मारेकऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी करमाळा पोलिस स्टेशन आणि करमाळा तहसिलदार यांना या संदर्भात निवेदन दिलं असून सदर आरोपी विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर धनगर समाज मोठं आंदोलन करेल. असा इशारा या निवेदनातून सरकारला दिला आहे.
या वेळी डॉ उज्जवला हाके, दादासाहेब केसकर, बाळासाहेब तोंडे पाटील, किशोर मासाळ, सरपंच संभाजी खडके, सचिन मलगुंडे, अनिल कायगुडे,सुरज खोमणे, रावसाहेब चोरमले, मुरलीधर ठोंबरे, किसन हंडाळ, सदाशिव कारंडे, राम शिंदे, विजय मेरगळ,अमोल मारकड, अण्णा मलगुंडे उपस्थित होते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.