नुतन गटविकास अधिकारी महेश पांढरे यांचा सत्कार पत्रकार विजय हुपरीकर यांच्या हस्ते

सांगली, दि. २१ जून, २०२०: पत्रकार विजय हुपरीकर यांनी केला नुतन गट विकास अधिकारी महेश पांढरे यांचा सत्कार. एक फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा झाला क्लास टु अधिकारी, दुष्काळी टापु असणारा सांगोला तालुका व तालुक्यातील कोळे हे त्यांचे गाव. पोटापाण्याचे साधन उपलब्ध नसल्याने साधारण १९८५ सालाच्या आसपास सर्व कुटुंब घेऊन मधुकर पांढरे हे सांगली येथे स्थायिक झाले. दुष्काळी टापुतुन आलेला मजूर हाताला मिळेल ते काम करायचे. सांगलीत काही जुनी मंडळी फळव्यवसाय करत होती, काही हमाली हि करत होते. मधुकर पांढरे हे फळव्यवसायाकडे वळले. त्यांनी आपले कुटुंब एकत्रित ठेवण्यात आज अखेर यश
मिळविले. घरात एकुण १७ व्यक्ती एकत्र मोठया आनंदाने राहतात. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू व एकमेकांना सहकार्य करण्याचा असलेने ते हळुहळू आपली सर्व कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यांना दोन मुली व दोन मुले असा परिवार, पत्नी शारदा या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायच्या. त्यांची सर्वच मुले ही शिक्षणात हुशार बी.डी.ओ. पदी निवड झालेले महेश यांचे शिक्षण १ ते ४ थीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत तर ५वी ते १०वीपर्यंत वानलेसवाडी हायस्कुल येथे पुढेचे कॉलेज शिक्षण विलिंग्डन काॅलेज सांगली  झाले. तसेच इंजिनियरिंग मुंबई येथे झाले. त्यांनी सर्व स्पर्धा परीक्षा तयारी मुंबई येथे केली. २०१२ साली ते मुंबई गेले. सातत्याने अभ्यास केला व अखेर यश मिळविले. आजही महेश सांगतात अभ्यासाला पर्याय नाही. तयारीसाठी रोज १० ते १५ तास रोज अभ्यास करावा लागतो. साधारण आठ वर्षे सातत्याने पोटाला चिमटे देऊन मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे हे असाध्य गोष्ट एक सामान्य फळविक्रेत्यांने करुन दाखविले. आम्हाला खरंच अभिमान आहे. आपणास भरभरून यश मिळत जावो. आपण एक वेगळा आदर्श घालून दिला व तो आम्हाला प्रेरणादायी असेल. महेश पांढरे यांचा सत्कार करताना नगरसेवक विष्णु माने, पत्रकार विजय हुपरीकर भारत व्हनमाने व मित्रपरिवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.