मेंढपाळाना स्थंलातरास विनाअट शासनाची परवानगी- खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाला यश
इचलकरंजी प्रतिनिधी, 06 जून, 2020: महाराष्ट्रातील धनगर मेढंपाळ बांधवाना विनाअट बिनशर्त महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात पशुधन मेंढरे शेळी यांना स्थलांतर करून चरण्यासाठी सर्व ठिकाणी शेतकरी अग्रीक्लचरलप्रमाणे परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेसाहेब यांना केली हाेती. त्याचप्रमाणे आदेश महाराष्ट्राचे प्रधान सचिव भूषण गगराणीसाहेब विभागीय आयुक्त मा. दिपक म्हैसेकरसाहेब यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकारी पोलिस महासंचालक, जिल्हापाेलिस प्रमुख, पशुसवर्धन सचिव प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत.
गेली अनेक दिवस झाले जिल्हातुन इतर जिल्हात जाण्यास मेंढपाळना परवानगी नव्हती याबाबत यशवंतसेनेच्यावतीने शिष्टमंडळ हातकणंगले खासदार धैर्यशिल माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणीसो व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांचेशी सपर्क करून आदेश काढण्यासाठी प्रयत्न केले .यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ धनगर समाज बांधव यांना झाला गेली तीन महिने झाले प्रत्येक जिल्हात धनगर मेंढपाळ अडकून बसले होते. त्या मेंढपाळाना गावी येण्यास काेणतीही अडचण येणार नाही. खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे.
धनगर समाज बांधवातुन काैतुक हाेत आहे. यावेळी इचलकंरजी शिवसेना उपशहर प्रमुख राजुदादा आरगे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय वाघमाेडे, राम कोळेकर, प्रा. लक्ष्मण करपे, संभाजी गावडे, अनिल वळकुंजे, संभाजी शिनगारे , जगन्नाथ माने, काशिनाथ शिनगारे, सुनिल सलगर, संदिप हजारे, राजेश तांबवे, कृष्णत शेळके, डॉ. गोरड, प्रकाश मेटकरी, अमोल मेटकर, अरुण फोंडे, बाळासाहेब मोटे, कैलास काळे, सचिन देशिंगे विकास घागरे, मच्छिंद्र बनसाेडे इत्यादी उपस्थित होते.
गेली अनेक दिवस झाले जिल्हातुन इतर जिल्हात जाण्यास मेंढपाळना परवानगी नव्हती याबाबत यशवंतसेनेच्यावतीने शिष्टमंडळ हातकणंगले खासदार धैर्यशिल माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणीसो व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांचेशी सपर्क करून आदेश काढण्यासाठी प्रयत्न केले .यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ धनगर समाज बांधव यांना झाला गेली तीन महिने झाले प्रत्येक जिल्हात धनगर मेंढपाळ अडकून बसले होते. त्या मेंढपाळाना गावी येण्यास काेणतीही अडचण येणार नाही. खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत