शेतकऱ्यांना विना अट पिक कर्ज तात्काळ वाटप करा- दत्ता वाकसे
बीड/प्रतिनिधी, 04 जून, 2020 : संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी यांना पाहिले जाते आज कोरोना सारख्या रोगाने थैमान घातलेले आहे त्यामध्येच शेतकऱ्यांना नगदी पिके असलेले कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे बँकेच्या अधिकारी यांच्याकडून मात्रं अनेक अटी शेतकऱ्यांच्या माथ्यावर लादल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या सातबाराच्यावर कर्जाचा बोजा असेल तर फाईल घेतल्या जात नाहीत मुळात शेतकरी वर्गाला कर्ज माफी झाल्यापासून कोरोना रोगाने थैमान घातले आणि लाकडाऊन लागू झाला त्यामुळे तलाठी देखील अत्यावश्यक सेवेसाठी गेले आणि त्यामुळे कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
त्यामुळे कर्जाचा बोजा सातबारावर कायम राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांनी आता निल सातबारा आणायचे आदेश दिले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू शकतात त्यामुळे नोटव्हीज आणि सातबारा वरील बोजाची अट रद्द करण्यात यावे त्याचबरोबर आता पेरणीचे दिवस आहे तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात आणि होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट कर्ज वाटप करा अन्यथा बँकेच्या समोर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे म्हटले आहे
तर बँकांना टाळे ठोकू
येणाऱ्या काही दिवसात जर अटी रद्द केल्या नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन बीड जिल्हा भारतीय टेस्ट बँकेच्या शाखेच्या समोर आंदोलन करणार असल्याचे देखील वाकसे यांनी म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत