सरगर वस्ती केरेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 295वी जयंती उत्साहात साजरी

केरेवाडी, 31 मे, 2020: आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 295 वी जयंती महाराष्ट्रभर प्रत्येक धनगर बांधव घर, गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर साजरी करत आहे. अहिल्याबाईंचा इतिहास पाहिला तर खूप वाखाणण्याजोगा व शिकण्यासाठी महत्वाचा आहे. आताच्या घडीला बघितले तर राजधानी दिल्लीमधील संसद भवन जे उभे आहे ते आपल्या राजमाता अहिल्याबाईंनी दिलेल्या जागेत अगदी थाटात उभे आहे. 
 त्याचबरोबर पूर्वी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी, पशु पक्षासाठी पाणपोई, बारव असे अनेक उपक्रम राबवले आहे. हे आताच्या तरुण पिढीला प्रोत्साहन व माहिती मिळण्यासाठी सरगर वस्ती येथील भगवान (गुरुजी) सरगर यांनी स्वतःच्या घरातून तसेच वस्तीवर प्रौढ तसेच तरुण पिढीला मार्गदर्शन होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सर्वांना एकत्र करून मोठ्या उत्साहात साजरी केली. अश्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर युवा तरुण तरुणीला गुरुजींनी आव्हान केले आहे की, ज्यांनी ज्यांनी पूर्वी इतिहास घडवला त्यांची जयंती, पुण्यतिथी प्रत्येकाच्या इच्छेनुसार छोटेखानी साजरी करून समाजाला जागृत ठेवले पाहिजे, असे अनेक कार्ये पुढे चालु ठेवावे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.