शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले कराल तर याद राखा-दत्ता वाकसे

नायब तहसीलदार रूपनर यांना मारहाणीचा जाहीर निषेध
बीड/प्रतिनिधी : कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशावर थैमान घातलेले असताना राज्यातील व जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणारे परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रुजू असलेले बाबुराव रुपनवर यांना चार युवकांनी दारू पिऊन मारहाण केल्याची घटना दिनांक 28/5/2020 चारच्या सुमारास रोजी घडली कोरोना प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
तो रोखण्यासाठी पोलीस, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार प्रशासन, नर्स, रात्रंदिवस मेहनत घेऊन सामान्य माणसाला अडचणी भासू नये यासाठी काम करत असताना गुरुवार, दि. 28 रोजी दुपारी चारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालना समोर येऊ बेलंबा येथील युवकांनी गोंधळ घालत  होते नायब तहसीलदार बाबूराव रूपनर आपल्या दालनातून बाहेर पडले असता त्यांनी त्या युवकांना विचारले असता आमच्या आताच्या आता फेरफारची नक्कल पाहिजे आहे आणि तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे म्हणत नशेतील चार युवकांनी  बाबूराव रूपनर यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली चष्मा फुटला शर्ट फाडले आहे विशेष म्हणजे ते नायब तहसीलदार बाबूराव रूपनर हे अपंग आहेत. त्यामुळे आगामी काळात शासकीय अधिकाऱ्यावर हल्ले कराल तर याद राखा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.