येत्या विधानसभेचा आमदार धनगर झाला पाहिजे : गोपीचंद पडळकर

सकाळ, सोमवार, 4 फेब्रुवारी 2019, मोहोळ : धनगर समाजाच्या गेल्या 70 वर्षाच्या चुकीमुळे आरक्षण मिळाले नाही, आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे. आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यासह आहे. समाजातील बहुजन जागा झाला पाहिजे, हा या मागचा हेतु आहे. शासन जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची नाही. गट तट विसरुन कामाला लागा. येत्या विधानसभेचा आमदार धनगर झाला पाहिजे, असे प्रतापादन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले.


मोहोळ येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी पडळकर बोलत होते. यावेळी चांदापुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष उतम जानकर, बाळासो शेळके, संतोष वाकसे, चेतन नरोटे, सूनील बंडगर, समता गावडे, ऍड. विनोद कांबळे, मोहन होनमाने, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, फंटु गोफने, दिपक गायकवाड, दादा करणावर, दादा पवार, काका देशमुख, सुनील पाटील, शामराव पाटील बीरू देवकते, गणेश गावडे, बाळासो वाघमोडे, शाहु देशमुख आदीसह बहुसंख्य समाज उपस्थित होता.

पडळकर पुढे म्हणाले, आरक्षण दिल्याशिवाय आता माघार नाही, अंधश्रदा बंद करा. समाजातील युवकांनी शिकुन प्रशासनात आले पाहिजे. आम्हाला सामाजिक आरक्षणाबरोबर राजकीय आरक्षण पाहिजे.

उत्तम जानकर म्हणाले, सरकारने फसवणुक केली आहे. आरक्षण न देताच मते घेतली आहेत. जनजागृती सभा सुरू झाल्यापासून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.