नवी मुंबईमध्ये मायाक्कादेवी मंदीर व अहिल्याभवन निर्माण करण्यासाठी निधी संकलनास आव्हान!

जय मल्हार, बांधवानो होळकर शाहीचा दैदिप्यमान इतिहासाला स्मरूण ह्या नवी मुंबई शहरामध्ये आपल्या धनगर समाजाची व होळकरशाहीची आण - बाण - शान वाढवणारी एखादी हक्काची वास्तु असावी. ह्या भावनेतुन राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, नवी मुंबई, (रजि. ई /3627 - ठाणे) ह्या संस्थेच्या वतीने जवळपास गेली १५ वर्षे महाराष्ट्र शासन (सिडको) यांच्या कार्यालायात अतिशय कठीण परीस्थितीत सतत पाठ पुरावा करून, वेळ प्रंसगी तीव्र आंदोलन करून, मायाक्कादेवी मंदीर व अहिल्या भवन बांधण्यासाठी नवी मुंबई  (सानपाडा) पामबीच भूखंड क्र.११, सेक्टर क्र. १६ए येथे ५००० स्क्वेअरफुटचा आपण भूखंड मिळवला आहे. त्या भूखंडावर जवळपास १५००० स्क्वेअरफुटचे बांधकाम करणार आहोत. साधारण ह्या बांधकामाला दीड कोटी रुपेय खर्च अपेक्षित आहे. २६ डिसेंबर २०१७ रोजी समाजातील दिग्गज नेते व होळकर शाहीचे वंशज मा. भुषणसिंग होळकर यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन सोहळाही संपन्न केला.



हि वास्तू  नुसती धनगर समाजाची आण- बाण - शाण नसुन भविष्यात हि वास्तू धनगर समाजाचे शक्तीकेंद्र ठरणार आहे. ह्या वास्तूमध्ये समाजाचे श्रद्धास्थान कुलस्वामिनी मायाक्कादेवी मंदिर बरोबरच, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी भव्य सभागृह व शिक्षण हाच विकासाचा पाया समजून उदात्त हेतुने समाजातील विद्यार्थी व तरुण वर्गाला हक्काच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून ह्या वास्तूमध्ये विद्यार्थी वसतिगृह व स्पर्धा परीक्षा लायब्ररी देखील बांधण्यात येणार आहे.

अशा भव्य, सुंदर आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचे सत्ताकेंद्र ठरू पाहणार्या वास्तूच्या निर्माणासाठी आपण सर्व बांधवांकडुन आम्ही आर्थिक व वस्तू स्वरूपात मदतीची आस धरून आहोत.
तेव्हा हे ऐतिहासिक कार्य पूर्णत्वास नेण्यास आपल्या सर्व बांधवांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करावी, हि आपणांस हात जोडून विनंती.

ह्या संस्थेचे सामाजिक कार्य समाजातील रिक्षावाले, माथाडी कामगार ते उच्च शिक्षित, आय.एस. अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक अशा सर्व स्तरातील व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर रीतीने सुरू आहे.

सध्या निधी संकलन अभियानासाठी संस्थेने श्री. महादेव अर्जुन, श्री. संतोष आखाडे, श्री. हनमंत बुरूगंले, श्री. रवि खांडेकर, श्री. जनार्दन झोरे, श्री. आनंद केशव शेळके यांची पूर्णवेळ नेमणूक केली आहे. तरी आपण समाजबांधवानी ह्या निधी संकलन करणार्या सेवकांना मनापासून आर्थिक मदत करावी. जे समाज बांधव (दहा हजारापेक्षा) १०,०००/- जास्त रक्कम देणगी स्वरूपात देतील. त्या समाज बांधवांचे नाव त्या वास्तू मध्ये कायम स्वरूपी कोरून ठेवण्यात येईल. ह्याची नोंद घ्यावी. ही नम्र विनंती.

टिप:- ज्या समाज बांधवांपर्यंत आमचे सेवक पोहचू शकत नाहीत असे समाजबांधव आमच्या संस्थेच्या बँक खात्यात आपली देणगी जमा करू शकता.
बँकेचे नाव :- भारतीय स्टेट बँक, शाखा:- जुईनगर, खाते क्रः- ६२२१५२९६८२२
आई.एफ.एस.सी. कोड - SBIN0021464
"राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण " ह्या नावाने आपणास धनादेश किंवा रक्कम भरता येईल. 

 कळावे,
 आपला विश्वासु
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण, ( सानपाडा ) नवी मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.