धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन, ९१ एल्गार मोर्चे निघणार

लोकमत, 28 जानेवारी 2019, मुखेड : महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.


मुखेड धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शहरातील जि.प हायस्कूल मुलींची शाळा येथे २७ जानेवारी रोजी धनगर आरक्षण एल्गार मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हाभरातून हजारोंचा पिवळा जनसागर उपस्थित झाला होता. कार्यक्रमास धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, माजी जि़प़अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, प्रा.डॉ. यशपाल भिंगे, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, सचिव डॉ.रामराव श्रीरामे, सभापती अशोकराव पाटील रावीकर, जि़प़सदस्या गंगासागर सुगावकर, विजय पाटील सुगावकर, माजी नगरसेवक जगन्नाथ कामजे, अ‍ॅॅड़शिवराज पाटील कुंद्राळकर, माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, दिलीप बंदखडके उपस्थित होते. पडळकर म्हणाले की, सत्ताधारी सरकारने धनगर समाजाला आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते, मात्र साडेचार वर्षे झाली, आरक्षण मात्र देण्यात आले नाही, असे सांगून सरकारला जागविण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.

यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. प्रास्ताविक भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर तर सूत्रसंचालन बालाजी नाईक व शिवाजी कोनापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य व्यंकटराव दबडे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, संभाजी पा. मावलीकर, जयवंत तरंगे, काशीनाथ येवते, पप्पू इमडे, व्यंकटराव पा. बेन्नाळकर, संजयसिंह देवकते, व्यंकटराव पा. हाळणीकर, उमेश इमडे, संभाजी मुकनर, विठ्ठलराव देवकते, हणमंत नरोटे, गणेश बिरु, सचिन श्रीरामे, माधव देवकते यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.