धनगर आरक्षण : तर खासदारपदाचा राजीनामा – डॉ. विकास महात्मे

Maharashra Today,  ७, जानेवारी २०१९, नागपूर: धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजात रोष,असंतोष व नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने ज्या निकाली काढला त्याच धर्तीवर धनगरांना आरक्षण देण्यात यावे . समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मला प्रसंगी खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला तर राजीनामाही देईल.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यापुढे आता राज्यात जिल्हास्तरावर पुढील 40 दिवस आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेतून दिली आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही धनगर समाजाची गेल्या 70 वर्षांपासूनची मागणी आहे. याकरिता अनेक आंदोलने करण्यात आली मात्र समाजाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता 9 फेब्रुवारीपासून राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलने करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात येत्या 9 फेब्रुवारीला यवतमाळ पासून होणार असल्याची माहिती डॉ महात्मे यांनी दिली. या आंदोलनात धनगर समाजाच्या सर्व संघटना व सर्व पक्षातील नेत्यांच्या सहभाग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गरज पडल्यास विधिमंडळाचे विशेष सत्र बोलावण्याची मागणी डॉ महात्मे यांनी यावेळी केली. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे सरकारने कबुल केले आहे.ते दिले पाहिजे.असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.असे असले तरी सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे, मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात पण आता उशीर खूप होतोय असेही डॉ विकास महात्मे म्हणाले. सरकारने मराठा समाजाविषयी जे केले ते चांगले आहे मात्र आमच्यासाठी काही केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.तसेच धनगर आरक्षण मुद्दयावर कोणीही विरोधक अजून उतरले नाही असेही डॉ विकास महात्मे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

युवा पिढी मध्ये वाढता तणाव आणि त्यातून घडणाऱ्या अप्रिय घटना जसे नैराश्य , आत्महत्या ,व्यसन किंवा अनैतिकता यांचे प्रमाण वाढत आहे.ही एक काळजीची बाब आहे.बुध्द्यांका पलीकडे या कार्यक्रमात सोशल इमोशनल लर्निंग कार्यशाळेच्या माध्यमातून ही आव्हाने हाताळल्या जाऊ शकतात.एस. एम एम.आय वेल फेअर चारिटेबल ट्रस्ट व्दारा संचालित महात्मे आय बँक आय हास्पिटल व पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे अभियान साकारल्या जात असून , २१ जानेवारी पासून या शिबिराची सुरुवात झाली आहे.चार आठवड्याचे हे शिबीर विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठीही आहे.काटोल ,कळमेश्वर येथील जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.मानवी आयुष्यात बुध्द्यांका पेक्षाही भावनांक अधिक महत्वपूर्ण आहे .याबद्दल जागरूकता निर्माण होऊन ,नैराश्य आणि अन्य संबंधित समस्येची टक्केवारी कमी होईल. अशी आशा डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.