आजरा तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या धनगर वाड्यातील गरजू समाज बांधवांच्या मुलांसाठी 'एक वही समाज बांधवांसाठी उपक्रमातून' शैक्षणिक साहित्य वाटप

आजरा : जुलै महिन्यात पावसाळा असल्याने  24 जुलै 2018 रोजी नियोजनाप्रमाणे आजरा तालुक्यातील वाड्यांवर शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यासाठी सकाळी लवकरच निघालो. वाड्या वस्तीवर लोक  कशी राहतात, घनदाट, जंगल, रस्ते नाहीत कि, साधी पाऊल वाटही व्यवस्थित नाही. काही ठिकाणी अजूनही लाईट नाही. दोन दोन कि.मीवरून  एकावर एक  पाण्याचे हंडे डोक्यावर व एक हंडा कडेवर घेऊन पाणी आणणाऱ्या  महिला हे चित्र जवळपास सर्वच धनगर वाड्यांवरच आहे. आज माझ्या बरोबर  मा.भुषणराजे होळकर. वंशज होळकर राजघराणे,  इंदोर, श्री.राजेश तांबवे, संस्थापक चेअरमन तांबवे ग्रुप आँफ टेक्निकल इन्स्टिट्युट पेठवडगाव, (Managing Director Tambave Engineering), मा. डॉ. संदिप हजारे, सामाजिक कार्यकर्ते, उजळाई वाडी,  डॉ. गोरड, सामाजिक कार्यकर्ते  यांना बरोबर घेऊन गारगोटी मार्गे आजरा जात  असताना प्रथम आजरा आणि  भुदरगड तालुक्याच्या सिमेवर  मेघोली धनगर वाड्यांवर प्रथम गेलो  असता शाळेचा दिवस असल्याने शाळेत गेलो, तर शाळेची अवस्था फारच  विचित्र होती. त्या शाळेत शिक्षकच  हजर नव्हते. मुलांना विचारले असता सर  कधी येतात, त्यावर त्यांचे उत्तर केव्हातरी येतात. मुलांनी दिलेल्या उत्तराने धक्काच बसला. पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळा  गळत होती. दरवाजा मोडलेला,  वर्गातील जमीन सगळी ओलसर त्यातच एकटीच लहान मुलं बसत असत. त्यांची परिस्थिती पाहिल्याने आम्हांला काही केल्याने राहवले नाही,

लगेच गटशिक्षणाधिकारी यांना  फोन लावला  असता,  सर आत्ताच शालेय पोषण आहाराची माहिती  दयायला केंद्र शाळेत  गेलेत असे  उत्तर मिळाले. मुलांना कोणी तरी घेऊन गेले तर काय.? या प्रश्नाचे उत्तर मात्र साहेबांनी दिले नाही. वाड्यांवर  एकही माणूस नव्हते. तेथील सर्वजण मजुरीसाठी गेली  होती. त्या शाळेत आम्ही मुलांना साहित्य देऊन आजरा तालुक्यातील वाडयांवर जाण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला. विस्तीर्ण असा पसरलेला चित्री धरण तुडुंब भरलेले आणि एका बाजूला जंगल, ठिक ठिकाणी धरणाच्या किनाऱ्यावर गळ टाकून मासेमारीसाठी  थांबलेले  बांधव होते. निसर्गाने मुक्त हस्ताने केलीली उधळण व त्यातच पडणारा पाऊस आणि धुक्याचा सुरू असलेला पाठशिवणीचा खेळ  यामधून आम्ही कधी  पाऊसात भिजत  निमुळता होत गेलेल्या रस्तावरून प्रत्येक वाड्यांवर जात होतो. आवंडी  धनगरवाड्यांवळ जिथंवर गाडी जाईल तिथंपर्यत  काही ठिकाणी काही अंतर चालत  मी व मा. भुषणराजे होळकर, श्री.राजेश तांबवे. डॉ.गोरड, डॉ. संदिप हजारे, हि मंडळी चिखलातून चालत, येवढी बिकट अवस्था पाहून हळहळ व्यक्त करीत माझ्या बरोबर फिरत होती. आज मेघोली धनगर वाड्यांपासुन सुरुवात करून आवंडी, पेरणोल धनगरवाडे  असे करीत शेवटी  आजरा हायस्कूल आजरा  येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  मा. भुषणराजे होळकर, राजेश तांबवे. उद्योजक, कोल्हापूर यांच्या हस्ते  तेथील विध्यार्थ्यांना गरजेप्रमाणे वहया देण्यात आल्या..

ह्या सामाजिक प्रवासात डॉ. संदिप हजारे यांच्या पुर्वपुण्याई हाँस्पिटलला, उजळाईवाडी येथे राजेनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या..
 आभार
 श्री.राजेश तांबवे, उद्योजक यांनी आजरा तालुक्यातील मुलांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य आम्हां सर्वांना जेवण  स्वतःची गाडी घेऊन उपक्रमात सहभागी झाले. त्याबद्दल त्यांचे आभार.
शब्दांकन : संजय वाघमोडे - 9405073872, 8766848986

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.