धनगर समाजाला एस.टी. सवलती देण्यास कटिबद्ध
दैनिक पुढारी, १४, जानेवारी २०१९ कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न अटी-तटीचा असताना भाजप सरकारने तो सोडविला. लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) च्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. जानकर म्हणाले, ‘टीस’चा अहवाल सकारात्मक आला आहे. साहित्यिक, कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी केंद्राकडे शिफारस करणार आहे. मागासवर्गीय अहवालाच्या धर्तीवर सरकार ‘टीस’चा अहवाल जाहीर का करीत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न हा केंद्राच्या ट्रायबलअंतर्गत येत असल्याचे सांगितले.
शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीने समाजाला अडाणी ठेवण्याचे काम केले. आरक्षणाचा पुळका असणार्यांनी काय केले, हे त्यांना विचारा. गेल्या चार वर्षांत सत्तेत आल्यापासून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा ‘एनडीए’चा घटकपक्ष आहे. चार राज्यांत मान्यता आहे. सभापती, जिल्हा परिषद सदस्य आहेत. संख्याबळानुसार कोठून लढायचे हे भविष्यकाळात पाहता येईल. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व जण सकारात्मक आहेत. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
साभार : http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dhangar-community-to-ST-Commitment-to-concessions/

गप्पा मारू नको
उत्तर द्याहटवानिवडूक आधी जर आरक्षण नाही दिला तर तुम्हाला दाखवू 2019 ला
उत्तर द्याहटवा