पट्टणकोडोलीत १३ जानेवारीला धनगर आरक्षण परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत दुर्लक्ष केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी सरकार  वेळकाढूपणा करत आहे, म्हणून समस्त धनगर समाजाच्या वतीने  गोपीचंद पडळकर व उत्तमराव जाणकार  याच्या मार्गदर्शनाखाली पट्टणकोडोली येथे १३ जानेवारी रोजी धनगर आरक्षण परिषदेचे आयोजन दिले आहे. असे आज (शुक्रवार) समस्त धनगर समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले.


महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळत नाहीत. धनगर समाजाला नवीन आरक्षणाच्या तरतुदीची गरज नसून फक्त घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे. धनगर समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागास आहे, यामुळे समाजाने प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून पट्टणकोडोली येथील बिरदेव मंदिराच्या प्रागंणामध्ये 'अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा' हि परिषदेचे आयोजन केले आहे.

यावेळी प्रा. डॉ. संतोष कोळेकर, प्रा. डॉ.  लक्ष्मण करपे, श्रीकृष्ण बुरूंगले, कृष्णात शेळके, संदीप कारंडे, जगन्नाथ माने, विजय गोरड, सचिन सलगर, बाबुराव हजारे आदी उपस्थित होते

साभार  : http://www.livemarathi.in/?p=32651

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.