मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, दगडफेक, दंगल आणि जाळपोळ, क्षणात एखाद्याचा संसार उध्वस्त करतात! मग हा दोष कोणाचा?

मुंबई : सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील खरात वस्तीवरील श्री. वसंत रामचंद्र रुपनर यांची परिस्थिती हलाखीची आपल्या कुटूंबाच्या  उदरनिर्वाहासाठी ते  मुंबई येथे वाहन चालक म्हणून नोकरी करीत होते,  आणि त्यांची पत्नी व दोन  मुलासह गावी राहत होती. वसंत रुपनर हे आठ पंधरा दिवसांनी गावी येत होते. आपल्या परिस्थितीशी सामना करीत हा संसार सुखाचा चालू होता.

असेच १ जुन २०१४ रोजी मुंबईहुन आपल्या गावी सांगोल्याकडे खासगी बसने यायला निघाले. अन अचानक सोशल मीडिया फेसबुकवर महापुरुषांच्या बदनामीचा मेसेज व्हायरल झाला त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन, रस्ता रोको. दगडफेक, दंगली, सुरु झाल्या. अन त्याच वेळी वसंत रुपनर प्रवास करीत असलेल्या गाडीवर कात्रज जवळ (पुणे) येथे दगडफेक झाली. दगडफेकीत वसंत रुपनर हे गंभीर जखमी झाले. त्यांना ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण ससून रुग्णालया नंतर खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची त्यातही कुटुंबातील कमवता कर्ता पुरुषाचीच अशी अवस्था असेल, तर दोन लेकरांना घेऊन ती बिचारी पत्नी काय करणार, क्षणार्धात दगडफेकीत एका परिवाराचे काय हाल झाले. आत्तापर्यंत उपचारासाठी तीन लाखापेक्षा जास्तच खर्च आला. तरीही काही उपयोग झाला नाही. वसंत रुपनरांचा कमरेच्या खालचा भाग हालत नाही. सर्वकाही जागेवर आज ते अंथरुणावर आहेत. घरात कमवतं कोणीच नाही. मुलं लहान त्यातही त्यांचा एक मुलगा अस्थिव्यंग असुन तो सांगोला येथील मुकबधीर शाळेत आहे. परिस्थिती  गरिबीची असल्याने व उपचारासाठी पैसे नसल्याने वसंत रुपनर हे घरीच आहेत. त्यांच्या मेंदूचे आँपरेशन करावयाचे असुन त्यासाठी मोठा खर्च आहे. त्यांच्या पत्नी सौ.सखुबाई रूपनर मोलमजुरी करतात. पण घरी अशा परिस्थितीत असणाऱ्या आपल्या पेशंटला एकटे ठेऊन कामाला तरी कशा जाणार?

काम नसल्याने उपासमार होत आहे. कधी जेवण तर कधी उपाशीपोटी राहून हे कुटुंब दिवस काढत आहे. अनेक लोक  घरी येऊन भेट देत आहेत. जोतो आपल्या परिने मदत करीत आहे. शासकीय मदतीसाठी सरकारला निवेदने दिली. अनेकदा शासनाच्या कार्यालयात हेलपाटे मारुन मारून  हूंबरठे झिजविले. पण मदत काही मिळाली नाही. एक दगडफेक झाली अन या कुटुंबाला उध्वस्त करून गेली. आता त्यांच्या दुसऱ्या मुलाची शिक्षणाची सोय पुण्यातील सामाजिक संस्थेने पुण्यात केली आहे. तो आता ११वी सायन्स मध्ये शिकत आहे. तरी मित्रांनो यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. रोज कुणाकुणाला मदत मागणार आणि आपण किती दिवस देणार, परंतु आपण सर्वानी मिळून सौ. सखुबाई रुपनर यांना काही तरी घरात राहुन करण्यासारखा व्यवसाय उभा करून दिला, तर त्यांना  आपल्या पेशंटची सेवा ही करता येईल आणि व्यवसाय करुन आपला संसार चालवता येईल. मी त्यांच्याशी तशी चर्चाही केली. तशी त्यांची ही तयारी आहे. पण आता गरज आहे.
आपल्यातील दानतृत्वाची त्यांना आपण सर्वजन मिळून सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरण घेऊन दिली,  तर कुटुंबाला आपण सावरु शकतो. ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्यांच्यासाठी काही तरी करु शकलो हे समाधान मिळेल. यासाठी गरज आहे ती आपल्या मदतीची केल्याने होत आहे  आधी केलेच पाहिजे.
सोशल मीडियाचा वापर झाला पाहिजे. पण त्याचा वापर कशाप्रकारे करायला हवा, हा ही विचार करायला पाहिजे. आपण प्रत्येकाने ठरविले तर फार काही अवघड नाही. शेवटी थेंबे थेंबे तळे साचे. आपण सहज जरी गाडी वरुन बाहेर पडलो, तरी शे-पाचशे खर्च होतात. तोच एक दिवसाचा खर्चच म्हणून त्यांना आपण मदत करूया, मला नक्कीच विश्वास आहे, कि आपल्याच बहिणीचा संसार परत उभारण्यासाठी आपण दादा म्हणून नक्कीच मदत करणार.याची मला खात्री आहे.

कोणास सौ.सखुबाई रुपनर यांना थेट आर्थिक  स्वरूपात मदत करायची असेल किंवा खात्री करून घ्यायची असेल तर खालील मोबाईल  नंबर वर संपर्क साधावा हि विनंती.
सौ.सखुबाई रुपनर - मोबाईल नंबर.७०३०३२६३९०

संपर्क : संजय वाघमोडे - ९४०५०७३८७२, ८७६६८४८९८६. कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा कि, जेणेकरून एखादी दानशूर व्यक्ती त्यांना मदत करू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.