धनगर समाज क्रांती मोर्चा मार्फत कै.मनजीत कोळेकर यांना श्रद्धांजली
औरंगाबाद : २४ डिसेंबर, २०१८ : कोकणवाडी येथील पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ सकल धनगर समाजामार्फत धनगर आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मनजीत कोळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, या वेळी कोळेकर यांना शाहिद घोषित करून त्यांच्या कुटुंबास ५० लाख रुपये ची आर्थिक सहकार्य करावे, त्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय सेवेत घ्यावे तसेच धूत हॉस्पिटल जवळ जालना रोड येथील चौकास शाहिद मनजीत कोळेकर यांचे नाव द्यावे अशी मागणी या वेळी समाज बांधवतर्फे करण्यात आली.
मुलीच्या लग्नाच्या दिवशीच कोळेकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली होती, त्यानी आपल्या हयातील वखार महामंडल मधील शासकीय नोकरी सोडून 30 वर्ष सोडून समाज कार्य जरत राहिले यात मोर्चा ,धरणे आंदोलन, निदर्शने, आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निम्मित सिद्धार्थ गार्डन येथील मुख्यमंत्री च्या कार्यक्रमात धनगर आरक्षणासाठी पिवळा भंडारा उधळून आंदोलन केले होते, अशी त्यांच्या कार्यची ओळख समाज बांधवांनी करून दिली,
या वेळेस श्रद्धांजली सभेत कोळेकर यांच्या कुटुंबातील त्याचे साडू कांचनवाडी येथील गणेश गलांडे, सासरे एकनाथ खटके यांच्या सह समाजातील नेते ,कार्यकर्ते, युवक प्रतिनिधी शहरातील तसेच जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते. या मध्ये जन क्रांती संघ चे अध्यक्ष डॉ.संदीप घुगरे, धनगर समाज क्रांती मोर्चा महिला संघटक मिराताई जानराव, जय मल्हार पतसंस्था चे संचालक नारायण खोसे, जगन्नाथ अप्पा रिठे, धनगर समाज क्रांती मोर्चा संघटक दीपक महानवर, गंगापूर पंचायत समिती चे माजी सभापती अरुण रोडगे, धनगर समाज संघर्ष समिती चे रंगनाथ राठोड, रासपा युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप रिठे, सुधीर महानवर, धनगर समाज उन्नती मंडळ चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी वैद्य, धनगर समाज क्रांती मोर्चा चे प्रसिद्धी प्रमुख संजय फटाकडे, चिकलठाणा चे कैलास रिठे, जानकर-पडळकर सोशल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष संतोष राहिंज, धनगर नेते कैलास गायके, गणेश दांगुडे, धनगर समाज क्रांती मोर्चा संघटक दादाराव मामा साळवे, अशोक जानराव, धुमाळ साहेब, गणेश भोजने, जानकर-पडळकर मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गणेश रोडगे, शहर संघटक गणेश सोनवणे, विनोद सोनवणे, ज्ञानु नगरे, लहुजी तांबे, अनिल शेजुळे, भाउसाहेब तांबे, लखन तांबे, दिपक तांबे, शिवा तांबे, नितीन भावले, नंदु राहिंज, भुषण शिंगाडे, संदिप हाके, गणेश तागड, सचिन तांबे, अजय तांबे, लखन राहिंज, सुनिल चौधरी, वैभव सोनवणे, दिलीप तांबे, शंकर आप्पा रिठे, अनिल तांबे, ज्ञानेश्वर तांबे, आदित्य मैंद, संतोष रिठे, लोकेश तांबे, सुनिल काळे, भाउसाहेब खोतकर, कृष्णा नजन, राहुल शिंगाडे,सुरेश खोतकर, पवन तांबे, नंदु तांबे, अक्षय तांबे, गोटु खोतकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत