धनगर समाजाचा आज तहसीलवर मोर्चा
म. टा. दि. २४ डिसेंबर २०१८, कर्जत : धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी कर्जत तहसील कार्यालयावर सोमवारी (२४ डिसेंबर) मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील आंदोलनाची सुरवात येथून होणार आहे. या निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये व शेताच्या बांधावर जाऊन समाज बांधवाना आरक्षणाचे महत्व सांगण्यात येत आहे.
मोर्चाचे संयोजक डॉ. इंद्रकूमार भिसे म्हणाले की, 'धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण सरकारला द्यावेच लागणार आहे. कारण आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनच ते निवडून गेले आहेत. आज सत्तेमध्ये असलेले सामाजाच्या प्रतिनिधींनी समाजाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. मात्र, समाज यामुळे विचलित झालेला नाही. आम्ही आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे.
धनगर समाजाला राज्यघटनेत अनुसुचित जमाती अर्थात एस. टी. आरक्षणाची तरतूद केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ वर धनगड, ओरान असे नाव आहे. परंतु हा शब्द अपभ्रंश (स्पेलिंग मिस्टेक) असून महाराष्ट्र सरकारने धनगड म्हणजेच धनगर होय अशी त्वरीत दुरुस्ती करुन धनगर समाजाच्या लोकांना अनुसुचित जमातीचे त्वरीत प्रमाणपत्र द्यावे. ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. काँग्रेस सरकारने आरक्षण दिले नाही. म्हणून भाजपचे सरकारला आमच्या लोकांनी मते देऊन निवडून आणले आहे. मात्र, त्यांनी केवळ आश्वासनाचे गाजर दाखविले आहे. राज्य सरकराने केंद्राकडे अहवाल देखील पाठविला नाही. ही बाब संतापजनक आहे. आता सरकारला आम्ही धारेवर धरणार आहोत,' असे डॉ. भिसे या वेळी म्हणाले. २४ डिसेंबरला कर्जत तहसीलदार कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा नेण्यात येणार असून धनगर व बहुजन बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाज, तालुका आरक्षण कृती समिती व बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. डॉ. इंद्रकुमार भिसे व अक्षय शिंदे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत