घोंगडी चालली परदेशी
दैनिक लोकमत – रवि, २०१२ जानेवारी १५, अंबड : आपल्याला आपली ओळख परदेशातून करून दिले जाते, तेव्हा ती कळते.
आपल्या घोंगडीचेही असेच झाले. ती कुठे असते, तिचा उपयोग काय, हे परदेशातून सांगण्यात
आले.घोंगडीला आरोग्याचे काही पदर आहेत. तिचे टोचणारे केस म्हणजे अँक्युप्रेशरचा प्रकार
असून, पित्त, संधीवात यांसारख्या अनेक आजारांत घोंगडीचा वापर परिणामकारक ठरत असल्याच्या
माहितीची उकल होत आहे. घोंगडीतील विणकामाच्या कलेची माहिती घेण्यासाठी अंबड तालुक्यातील
ताडहादगाव येथील दत्ता चाळगे यांना पुढच्या महिन्यात थायलंड, इंडोनेशियात होणार्या
आंतराष्ट्रीय हस्तकला प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले असून, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेमार्फत ते प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ते चरख्यावर सूतकताई करून घोंगडी विणतात.
चाळगे कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय सध्या तोलाजी व शेषकला चाळगे चालवत आहेत. आर्थिक
अडचणींनी शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या दत्तांनी या पारंपरिक व्यवसायाकडे मात्र पाठ
फिरविलेली नाही.
बहुगुणी घोंगडी
अडगळीत
आजच्या दुलई,
गालिचा, गादी, रजई आदींमुळे घोंगडी अडगळीत पडली आहे. घोंगडी अंथरण्याची किंवा पांघरण्याची
वस्तू नसून, तिचा आरोग्याशीही संबंध आहे. घोंगडीच्या केसामधील गर्मीमुळे पित्त कमी
होते. मणक्याचे तसेच स्नायूंचे आजार, अनुवांशिक अँलर्जी, संधीवात, चरबी कमी होणे, रक्ताभिसरण
संतुलीत ठेवणे आदी आजारांसाठी घोंगडीचा फायदा होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
पूर्वी पावसात घोंगडीचा घोंगटा तयार करून डोक्यावर घेतला जात असे. परंतु रेनकोट, छत्रीचा
वापर वाढल्याने घोंगटा मागे पडला.
केस कातरून
घोंगडी
एक पारंपरिक
घोंगडी तयार करण्यासाठी दोन व्यक्तींना पंधरा दिवस लागतात. मेंढय़ांचे केस कातरून ते
पिंजून त्यापासून लोकर तयार केली जाते. लोकर कातून सूत तयार करून पारंपरिक लाकडी यंत्रावर
घोंगडी विणली जाते. घोंगडी विणताना चिंचोक्यापासून तयार केलेली खळ लावली जाते. एका
घोंगडीसाठी साधारणत: साडेपाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो. ही तयार घोंगडी विकण्यासाठी
दारोदार फिरावे लागते तेव्हा कुठे ७00 ते ८00 रुपये मिळतात. म्हणजेच दोन व्यक्तींच्या
पंधरा दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना दीडशे ते दोनशे रुपये नफा मिळतो. परंतु, हा नफा
रोजंदारीपेक्षाही कमी असल्याने व शासन दरबारी वेळोवेळी विनंती करूनही या व्यवसायाकडे
शासनाने दुर्लक्ष केले आहे.
नव्या पिढीने
या व्यवसायाकडे पाठ फिरविली. घोंगडी विणकामाच्या कलेला खादीप्रमाणे उद्योगाचा दर्जा
देण्यासाठी जोधपूर येथील लोकर संकलन केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही तसे केंद्र स्थापन
करावे.- राम लांडे, धनगर समाज कार्यकर्ता
हा आमच्यासाठी
आनंदाचा क्षण आहे. आपली कला जगासमोर येत
आहे. चरख्यावर लोकरीपासून सूत तयार करण्याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात
देणार आहोत.- दत्ता चाळगे, घोंगडी कारागीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत