श्री खरसुंड सिध्द (खरसुंडी)
आटपाडी तालुक्यामध्ये
श्री खरसुंड सिध्दाचे प्राचीन देवस्थान असून ते सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे आहे. मायाप्पा
गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील
एका कालवडीच्या स्थनातून दुधाची धार सुरू झाली या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून
दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंड सिध्द - खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त
झाले.
माणदेशाचे
आरध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून खरसुडी येथील सिध्दीनाथ मंदीर प्रसिध्द
आहे.श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख,पुरातन दगडी आहे.त्याचे बांधकाम हेमाडपंथी
पध्द्तीचे आहे.मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी
मंदिराची रचना आहे. नगारखाना नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.सभामंडपावर पूर्वीचे
पत्र्याचे छत आहे.औंध संस्थेचे अधिपती बाळासाहेबमहाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द
कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे.त्यानंतर भक्तगणानी त्याच्या खाली सुदंर
सिमेंट बांधकाम केले आहे.गाभार्यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री
सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे.समोर स्वयंभू लिंग आहे.
गाभार्यावर
सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिकरावर भक्तगाणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची
स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली.श्री सिध्दीनाथ मंदिराचा
दिवस नित्य पहाटे चार वाजाआता सनई-चौघडावादनाने सुरू होतो.त्यानंतर मूर्तीस अभिषेक
घालून पत्रीपूजा बांधण्यात येते.त्यानंतर ’श्री’ची कापडी पूजा बांधण्यत येते.संपूर्णपणे
कापडाचा वापर करून विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे.
श्री सिध्दनाथ
मंदिर व परिसर व्यवस्थापनाचे काम श्रीनाथ देव-देवस्थान ट्रस्ट पाहत आहे.सध्या देवस्थान
समितीने श्री साथी चांदीच्या रथाचे काम हाती घेतले आहे. त्यासथी तीनसे पन्नास किलो
चांदी वापरण्यात येणार आहे.देवस्थानाच्या वतीने अन्नछ्त्र,रुग्णालय,भोजनगृह,वाहनतळ
धर्मशाळा या योजना राबविण्यात येणार आहे.या भागात खिलार जनावरांची पैदास चांगली आहे.
येथील यात्रेमध्ये जनावरांच्या खरेदीसाठी देशा-प्रदेशातून लोक येतात.भक्तांची भाविकता
व शासकीय योजना याची योग्य सागंड घातल्यास खरसुडी हे माणदेशात आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून
प्रसिध्द होईल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत