आरेवाडीच्या कैपतनृत्य मंडळाला ‘कर्तव्य दक्ष सेवा गौरव पुरस्कार’ ग्राहक पंचायतच्या वतीने उद्या सांगली होणार गौरव
मुंबई : ग्राहक पंचायत सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘कर्तव्य दक्ष सेवा गौरव’ सांस्कृतिक पुरस्कार आरेवाडीतील कैपत नृत्य मंडळाला घोषीत करण्यात आला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी ग्राहक दिनानिमित्त सांगली येथे गौरव करण्यात येणार आहे.
ग्राहक संरक्षण कामी वाहून घेतलेल्या ग्राहक पंचायत सांगली ही संस्था गेल्या 32 वर्षापासून कार्यरत असून मागील 9 वर्षापासून विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना उत्कृष्ट कार्याबद्दल कर्तव्य दक्ष सेवा गौरव पुरस्कार देत आहे. यावर्षी आपल्या गावातील सातासमुद्रापार गेलेल्या कैपत नृत्य कला जपणार्या श्री बिरोबा गजनृत्य वालूग मंडळाला देण्यात येणार आहे. उद्या सांगली येथे शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोणताही प्रस्ताव न मागविता स्वतः दखल घेवून ही संस्था पुरस्कार देत असते. याचाच एक भाग म्हणून सांगलीचे नाव देशभर प्रसिद्ध करणार्या व हल्लीच्या रिमिक्स जमान्यात आजही ही पारंपारिक लोककलेचा वारसा जपणाऱ्या आरेवाडीचा विचार केला आहे. तसेच या कलेतून शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम व समाजाचे मनोरंजन होत असतो. हीच दखल घेत कैपत नृत्य कला जपणार्या आरेवाडी गावाचा गौरव करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे ग्राहक पंचायतीचे सांगली जिल्हा सहसंघटक दत्ता मोहिते यांनी सांगितले.
शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही लोककला जपणारे आरेवाडी हे एकमेव गाव असून संस्कृती जपण्यामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे कुठेतरी या वैभवाची दखल घेतली जात असून अनेक ठिकाणी सन्मान केली जात आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे आरेवाडीच्या कलाकारांचे अनेक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शब्दांकन
दाजी कोळेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत