आरेवाडीकरांच्या वतीने स्व. शेंडगेबापुंना अभिवादन

आरेवाडी : समाज विकासाचा ध्यास घेतलेला नेते माजी मंत्री समाजरत्न स्व. शिवाजीराव (बापू) शेंडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तमाम आरेवाडीकरांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. बापुंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्याला उजाळा देण्यात आला.

स्व. शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनी आरेवाडीतील बिरोबा देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच बापू नेहमी माझे गाव आरेवाडी असल्याचे सांगत असत. त्यामुळे शेंडगे कुटुंबीय आणि आरेवाडी यांचे एक अतूट नाते आहे. हे नाते असेच अतूट ठेवत बापूंच्या मंदिर उभारणीतील योगदानाच्या आठवणी यानिमित्ताने व्यक्त करण्यात आल्या.

आज सकाळी 11 वा. आरेवाडी बिरोबा बनात समस्त पुजारी मंडळ व बिरोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने स्व. शिवाजीराव (बापू) शेंडगे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पै. रावसाहेब कोळेकर यांच्या हस्ते बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ट्रस्टी औदुंबर कोळेकर, माजी विश्वस्त विष्णू कोळेकर, पुजारी जयवंत कोळेकर, शिवाजी कोळेकर, विलास कोळेकर, लक्ष्मण कोळेकर, सुनिल कोळेकर आदींसह आरेवाडीतील ग्रामस्थ, पुजारी व भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.