पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय लोककलांचे सादरीकरण
मुंबई : गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात साकारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेल्या 'सरोवर उत्सव-२०१८' मध्ये महाराष्ट्राची लोककला असलेल्या कैपत नृत्याने चांगलीच हवा करत वाहवा मिळविली. आज दि. 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या उत्सवप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि. 17 ते 21 डिसेंबर 2018 दरम्यान सुरू असलेल्या या सरोवर उत्सवामध्ये देशभरातील 20 राज्यांच्या लोककला सादर करण्यात आल्या. त्यामध्ये आरेवाडी जि. सांगली येथील कैपत नृत्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत आपली ढंगदार लोककला सादर केली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व विविध विभागाचे सचिव आदि मान्यवर उपस्थित होते. देशभरातील विविध राज्यांचे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस आयुक्त व अधीक्षक असे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जागतिक पातळीवर गाजलेल्या कैपत नृत्य कलेने जगातील सर्वात उंच असलेल्या Statue Of Unity या सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपली लोककला सादर करणे, हा एक योगायोग आहे. बिरुदेवाच्या भक्ती आणि सेवा भावनेतून जपली जात असलेली ही लोककला आजही आरेवाडी या गावाने जतन केली आहे. १९५८च्या दिल्ली दौऱ्यापासून आजपर्यंत विदेशासह देशभरात जाईल तिथे वाहवा मिळविली आहे.
अशा या अविस्मरणीय सरोवर महोत्सवमध्ये आरेवाडीतील अनिल शामराव कोळेकर, केरू शंकर कोळेकर, तुळशीराम ज्ञानू कोळेकर, दत्ता भिमराव कोळेकर, मारुती पांडुरंग कोळेकर व समाधान दाजी कोळेकर या कलाकारांनी सहभागी घेतला होता.
शब्दांकन
दाजी कोळेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत