माणदेशांत म्हसवड येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

दै. सकाळ, दि. २५ डिसेंबर २०१८, झरे - सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे 18,19, 20 जानेवारी २०१९ रोजी तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी दिली.
झरे येथील जवाहरलाल नेहरु विद्यालयामध्ये संमेलनाच्या  नियोजनची बैठक पार पडली. यावेळी अहिल्यादेवी शिक्षण संस्थचे चेअरमन प्रा. आर. एस. चोपडे, श्री सद्गुरू कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, निहारीका खोंदले आदी उपस्थित होते.

या साहित्य संमेलनासाठी म्हसवड,  सांगली,  सातारा,  सोलापूर, कोल्हापूर व पुणे येथील साहित्यकार उपस्थित राहणार आहेत. तरी या संमेलनासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याचची माहिती अध्यक्षांनी दिली.

जिल्हा परिषद शाळा म्हसवड येथे 50 हजार लोकांची बैठक व्यवस्था केली आहे. तरी ग्रंथ दिंडी, मिरवणूक, शोभा यात्रा याची जबाबदारी अहिल्याबाई शिक्षण संस्थेने घेतली असल्याचे प्रा आर. एस. चोपडे यांनी सांगितले.

या साहित्य संमेलनामध्ये धनगर आरक्षणचे वास्तव व दिशा तसेच धनगर समाजामध्ये उद्योजक का तयार होत नाहीत त्याबाबत विचारमंथन करणारे चर्चासत्र व धनगर जमातीचे शिक्षण व पुढील वाटचाल आणि प्रशासनातील धनगर समाजातील काल आज आणि उद्याचे स्थान काय ? याबाबत व्याख्याने व चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.

फेसाटीकार नवनाथ गोरे यांची मुलाखत होणार आहे. महिला आणि युवकांसाठी काव्य संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.