आरेवाडीच्या लोककलेला कर्तव्य दक्ष सेवा गौरव पुरस्कार प्रदान! ढोलाच्या दणाणाने मान्यवरांचे स्वागत

आरेवाडी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत सांगली यांच्या वतीने काल आरेवाडीची पारंपारिक कैपत नृत्यकलेला 'कर्तव्य दक्ष सेवा गौरव पुरस्कार' मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भरगच्च नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
पारंपरिक लोककलांच्या पडत्या काळात म्हणजे रिमिक्सच्या जमान्यात आरेवाडीकरांनी आजही कैपतनृत्य जपत सातासमुद्रापार नेले आहे. तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरुदेवाचा लाभलेला पदस्पर्श, हे त्याला मुख्य कारण आहे. या नृत्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होत असून करमणुकही होत असते. त्यामुळे या कलेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. तर ह.भ.प. गुरुनाथ कोटणीस महाराज अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्राहक पंचायतच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी, शिक्षण, क्रीडा व व्यक्तीगत पुरस्कार देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.