धनगर आरक्षण: राज्याकडून केंद्राकडे शिफारसच नाही

दै. महाराष्ट्र टाइम्स,नवी दिल्ली: धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन देणाऱ्या राज्यातील भाजप सरकारनं समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याचं समोर आलं आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला जनजातीय कार्य मंत्रालयानं लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारला पाठवला नाही. कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित राज्याच्या अनुसूचित जाती-जमातींच्या यादीत समाजाला स्थान देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधित त्या-त्या राज्यांकडून शिफारस करणे अपेक्षित आहे, असं जनजातीय कार्य मंत्रालयानं लेखी उत्तरात नमूद केलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये स्थान मिळण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर महानिबंधक आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग शिफारस पाठवतात. या प्रक्रियेनंतरच संबंधित समाजाला एसटी प्रवर्गामध्ये स्थान दिलं जातं, असं त्यात म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.