परस्पर सामंजस्य व परस्पर आदर भावना बाळगावी – के एल खाडे

धनगर समाजाचे ज्येष्ट विचारवंत के एल खाडे यांनी समाजाच्या काही नेमक्या उणिवांवर बोट ठेवले. परस्पर सामंजस्य व परस्पर आदर भावना बाळगण्याचे त्यांनी आवाहन केले. गत काळातील काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, शिवकालाच्या पूर्वीपासून इतिहासामध्ये धनगर समाजाचा मोठा वाटा आहे. यशवंतराव होळकर व नेपोलियन हे दोघेही इंग्रजांचे शत्रू होते.
होळकरांनी इंग्रजांना अठरा वेळा पराभूत केले होते. परंतु, आपल्या समाजाचा इतिहास आपणास माहीत नसल्याने समाज मागे राहिला आहे.” प्रा जाधवर यांनी माधव ( माळी, धनगर, वंजारी) या सामाजिक राज – कारणाची आठवण केली. विश्वासघातकी सहकारींमुळे महानायकांचा घात झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.