समाज विश्वास घातकी नाही, लोभामुळे व दिशाभुलतेने तसा वागतो – अक्कीसागर

ऑल इंडीया रिझर्व बॅंक ओबीसी एम्पलॉइज असोसिएशनचे अध्यक्ष एस एल अक्कीसागर उपस्थितांचे आभार मानताना म्हणाले, 28 ऑक्टोबर 2011 ह्या दिवशी महाराजा यशवंतराव होळकर यांचा 200 वा स्म्रुतीदिन होता. होळ ते भानपुरा व्हाया इंदुर, महाराजा यशवंतराव होळकर 200 व्या स्म्रुतीदिना निमित्त राष्ट्रीय एकात्मता रॅली काढली गेली. मध्यप्रदेश राज्यातील भानपुरा येथील महाराजा यशवंतराव होळकर यांचे छत्रीस्थळी जावुन त्यांच्या स्म्रृतीस श्रद्दांजली वहाणारे मा. जानकर हे एकमेव नेते ठरले.
आज महाराष्ट्राची सांस्क्रुतिक राजधानी पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मा. जानकर यांचे उपस्थितीत पार पडत आहे. हा विलक्षण योगायोग आहे.” या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धनगर अस्मिताचे मुख्य संपादक प्रकाश खाडे यांचे त्यांनी खास अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, धनगर हा भारतातील सर्वात मोठा तसेच मोठा ऐतिहासिक वारसा असणारा समाज आहे. परंतु महाराजा यशवंतराव होळकर यांचेवर चरित्र ग्रंथ लिहिण्यासाठी इंदुरचा क्षत्रिय धनगर समाज 1940 ते 1965 पर्यंत लेखक शोधत होता. ज्येष्ठ इतिहासकार स्व. न. र. फाटक लिखित पहिला चरित्रग्रंथ 12 नव्हेंबर 1967 रोजी प्रकाशित झाला. आज 13 नव्हेंबर 2011 रोजी आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 200 व्या स्म्रुतीदिन वर्षात दुसरा चरित्रग्रंथ प्रकाशित होत आहे. आपला समाज विश्वास घातकी नाही, लोभामुळे व दिशाभुलतेने तसा वागतो. चुकीच्या चळवळीं’मुळे बहुजन शब्द बदनाम झाला आहे. मा. जानकर यांनी राष्ट्रीय समाज हे नवीन बलवाचक नाव दिले आहे. या राष्ट्रावर प्रेम करणारा, या राष्ट्राला सर्वापरी मानणारा तो सर्व राष्ट्रीय समाज. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो वा भाषा- प्रांताचा असो.” चरित्रग्रंथ लिहुन महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास पुनर्जिवित केल्याबद्दल संजय सोनवणी यांचे, चरित्रग्रंथाचे वस्तुनिष्ठ तरीही प्रवाही आणि प्रभावी विश्लेषण केल्याबद्दल मा. नरके यांचे श्री अक्कीसागर यांनी विशेष आभार मानले. तसेच इतर मान्यवरांचे आणि तरुण-थोर उपस्थितांचेही त्यांनी आयोजकांतर्फे आभार मानले.
संजय सोनवणी लिखीत व प्रकाशीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मा. नरके यांनी आवाहन करताच सर्वपथम 1000 रुपये देवुन मा. जानकर यांनी 10 प्रती घेतल्या. त्याबरोबर हजार – पाचशे रुपये देवुन ग्रंथ विकत घेणार्यांची रांग लागली. हातो हात पहिली आवृत्ती विकली गेली. हा सुध्दा पुस्तक विक्रीचा एक विक्रमी सोहळा होता. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्याच्या कानकोपर्यातुन लोक आले होते. यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता. यावेळी अखिल भारतीय धनगर समाज युवा ग्रुपचे रोहित पाढंरे, रविंद्र खोरकर, आनंद कोकरे, आनंद गोरे, बापुराव सोनलकर, गोरख डुबे, संतोष जानकर आदी उपस्थित होते. सांगलीचे माजी महापौर प्रा. नितिनराव सावगावे, पुण्याचे माजी महापौर मा. नाना नाशिककर, नगरसेविका सौ. अलकाताई खाडे, किर्लोस्कर / स्त्री / किस्त्रींमचे संपादक विजय लेले, सेवानिवृत लष्करी अधिकारी श्री. फडकेसाहेब, ज्येष्ट धनगर समाज नेते राजाभाऊ लासुरे, विश्व हिंदू परिषदेचे श्री अशोकराव चोरमले, वसुंधरा परिवाराचे अध्यक्ष धनंजय झुरंगे, मावळा संघटनेचे बाळासाहेब कोराटे, माण देश फाउंडेशनचे पदाधिकारी/ रासप नेते अशोकराव माने, मी अहिल्या होणार गं या चित्रपटाचे निर्माते एड. रमेश येडगे, पुण्यश्लोकचे संपादक गणेश पुजारी, अभिमन्यु गाडेकर, डॉ. शरद गलंडे, माजी प्राचार्य शेळकेसर (श्रीरामपुर), हवेपासुन विज निर्मिती करणारे बिरुदेव हजारे, एम डी रामटेके, पत्रकार अमोल पांढरे, धनगर समाजावर पी. एचडी करणारा विध्यार्थी सोमनाथ घोलवे आदी राष्ट्रीय समाजातील विविध सामाजिक / राजकीय संघटनेचे पदाधिकारी / नेते / कार्यकर्त तसेच रासपचे अनेक नेते / कार्यकर्ते मान्यवर गण (रासप नेते दशरथराव राऊत / गोविंदराम सुरनर आदी.) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विक्रांत काळे आणि टिमने विशेष कष्ट घेतले. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
साभार राष्ट्रीय समाज ब्लॉग स्पोट वरून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.