शांत, संयमी, कर्मयोगी- बॅरिस्टर टी. के. शेंडगे प्राचार्य आर. एस. चोपडे
बॅरिस्टर टी. के. शेंडगे
यांचा जन्म पेड ता. तासगाव येथे 25 मार्च 1917 रोजी एका सामान्य शेतकरी
कुटुंबात झाला. लहान वयातच आपण काहीतरी वेगळे करुन दाखवायचे ही जिद्द
त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षी ते शाळेत दाखल
झाले. आपल्या मुलाची ही शैक्षणिक आवड त्यांचे वडिलांचे लक्षात आली व याला
नामवंत वकील करावयाचे हे त्यांनी बोलून दाखवले. हेच ध्येय घेऊन आपण गांधी,
नेहरू सारखे बॅरिस्ट, बनायचा ध्यास त्यांनी घेतला व तो त्यांनी पूर्ण
केला.
प्राथमिक शिक्षण पेड येथे, माध्यमिक कोल्हापूर येथे व कॉलेजचे शिक्षण
कोल्हापूर व बेळगाव या ठिकाणी झाले.कोल्हापूरात
राजाराम कॉलेज या विख्यात कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना कुस्ती या
विभागात विद्यापीठाची जनरल चँपियनशिप मिळाली. पोहणे या खेळातही त्यांचे
प्राविण्य होते. भरदार बांधेसुद शरीरयष्टीमुळे ते चटकन सगळयांना नजरेत भरत
असत. बॅरि. पी.जी., बॅरि. बाबासाहेब भोसले, बॅरि. बागवान, क्रांतिवीर
नागनाथ अण्णा, शिवाजीराव भोसले यांची भेट व मित्रत्वाचे संबंध शाहू
बोर्डिंग हाऊस कोल्हापूर येथेच आला. या मित्रपरिवाराने उच्च पदवी
मिळवण्याचा ध्यासच घेतला. वसतिगृहाने त्यांना संस्कार दिले, कमवा व शिका,
हा संदेश दिला व स्वावलंबन हा मंत्र दिला. या मंत्राच्या जोरावर त्यांनी
लंडनला जायचा निश्चय केला.
बॅरिस्टर शेंडगे साहेबांची आर्थिक परिस्थिती बेताची होती शिवाय
लंडनमध्ये राहायचे म्हणजे खर्चाचे हे कोडे कसे सोडवायचे हो प्रश्न होता.
धनगर समाजातील एक मुलगा लंडनला जाण्याचे स्वप्न पाहतोय ही बातमी
समाजबांधवांमध्ये पसरली व शेकडो मदतीचे हात पुढे आले. त्यामध्ये मुंबईला
उपजीविकेसाठी गेलेला कामगार वर्ग हा मोठय़ा प्रमाणात पुढे आला. 2 रु. पासून
त्यावेळी 100 रुपयांपर्यंत मदत, समाजबांधव व शिक्षण प्रेमी यांचेकडून झाली व
लंडनला जावयाची तयारी झाली. या मदतीमध्ये आटपाडी, माण, जत, तासगाव
तालुक्यातील लोकांनी आघाडी घेतली. प्रवासखर्च रु. 1700 व 3 महिने लंडनमध्ये
राहायचा खर्च अशा मदतरुपाने जमा झाला.
त्यावेळी विमानप्रवासासाठी खूप खर्च येत असे. सन 1950 रोजी बोटीने
जाण्याचे ठरले. त्यांनी भारत सोडला बोटीला प्रवास 17 दिवसांचा होता. सर्व
थरातील समाजबांधव मुंबईस नोरोप देण्यासाठी जमा झाले होते. या सामान्या
माणसांच्या भावना पाठीशी घेऊन मी लंडनला जातोय. त्यांच्या ऋणाची उतराई मला
करावयाची आहे. बॅरिस्टर बनून त्यांच्यासाठी काहीतरी करावयाचे हा निश्चय
त्यांनी डेकवरच झाल्याचे अनेकवेळा बोलून दाखविले. लंडनमध्ये काही दिवस
इंडिया हाऊसमध्ये राहिले व नंतर एका इंग्रजी कुटुंबात पेइभग गेस्ट म्हणून
राहिल. बॅरिस्टरच्या कोर्सला ऍडमिशन घेतले. कोर्स तसा अवघड होता. पूर्णवेळ
देऊन शिकणे महत्वाचे होते. थोडय़ाच दिवसात जवळपासची पुंजी संपली आता काय
करावयाचे हा प्रश्न पडला. बॅरिस्टर साहेबांना तीन बंधू, त्यापैकी दोन
प्राथमिक शिक्षक व एक शेती करत होते. प्राथमिक शिक्षकाचा पगार अत्यंत अल्प
त्यातूनच ते थोडेफार पैसे पाठवीत समाजातील लोकही सुरुवातीस लोकही थोडी मदत
देत तथापि 6 महिन्यानंतर हे थांबले अजून तीन वर्षे काढायची होती. आणि
म्हणून साहेबांनी स्वावलंबन व कमवा व शिका, या तत्वाचे खऱया अर्थाने आचरण
करायचे ठरविले. ते आठवणी सांगताना म्हणायचे मला कोणतेही काम करण्याची आवड
होती. कोणतेही काम हलके वाटत नसे म्हणून प्रसंगी मी फळांच्या बागेत कष्टाचे
काम केले व अर्थार्जन केले. एक वर्ष मिळवण्यासाठी खर्च करावयाचे व
मिळवलेले पैसे घेऊन पुन: दुसरे वर्ष शिकवण्यासाठी असा क्रम ठरला त्यामुळे
या कोर्सला त्यांना 7 वर्षे घालावावी लागली. पण कोर्स पूर्ण करुनच गावी
जायचे हा निर्धार। त्यामुळे अनेक संकटे कुटुंबावर आली. पितृछत्र हरपले
जवळच्या नात्यातील माणसे गेली. तथापि त्यांचा निर्धार तसुभर कमी झाला नाही.
1958 ला ते बॅरिस्टर झाले व पुन: अर्थार्जन करुन भारतात आक्टोबर 1559 परत
ला आले जंगी स्वागत मुंबईला झाले या कालावधीत एक आठवण सांगताना ते म्हणत
होते, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एक पत्र आले होते. त्यात त्यांनी म्हटले
होते, तुकाराम, तू अडचणीत असशील पैसे हवे असल्यास कळव, त्यांना पत्राचे
उत्तर दिले, अण्णा स्वावलंबन व कमवा शिका हे मंत्र तुम्ही आम्हाला दिले तर
त्याचा वापर आम्ही प्रत्यक्षात न करता तुमच्या मदतीवर अवलंबून राहिला तर तो
तुम्ही दिलेल्या संस्कारांचा पराभव होईल. अण्णा, तुमचा आशीर्वाद पाठिशी
असू द्या, तेवढे पुरे मी भारतात आल्यावर तुमची भेट घेण्यास येईन. तथापि
कर्मवीरांचे निधन 1959 ला झाले व त्यांना भेटण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
पण ज्यावेळी ते परत आले ते तडक साताऱयाला गेले. बॅरि. पी.जी. पाटील यांना
भेटले व आण्णांचे समाधी स्थळावर जाऊन कितीतरी वेळ मूकपणे अश्रू ढाळले. ही
त्या दोघांची अण्णांना श्रद्धांजली होती अण्णा, तुमचे कार्य आम्ही पुढे नेऊ
हाच निर्धार परत एकदा त्यांनी केला. बॅरि. पी. जी., शिवाजी कॉलेजचे
प्राचार्य होते त्यांनी शेंडगेसाहेबांना कॉलेजमध्ये नेऊन मोठा सत्कार केला व
म्हणाले हाच तो कर्मवीरांचा संदेश स्वत: आचरणात आणणारा पेडचा तुकाराम
शेंडगे.
याच काळात धनगर समाजोन्नती मंडळाची स्थापना करुन स्व. यशवंतराव चव्हाण
यांचे अध्यक्षतेखाली एक परिषद सांगली येथे घेणेत आली. बॅरि. साहेबांनी
त्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यामुळे समाजात जागृतीचे वारे वाहू
लागले आपणास खंबीर नेता मिळाला याचा आनंद सर्वांना झाला व माणसांचे मोहोळ
या व्यक्तीभोवती आले. रत्नपारखी यशवंतराव चव्हाणांच्या नजरेतून हे सुटले
नाही. त्यांनी बॅरिस्टर साहेबांना राजकारणात ओढले व जत या सांगली जिह्यातील
मतदार संघातून काँग्रेसतर्फे उभे केले व 1962 साली साहेब जतमधून प्रचंड
मताधिक्याने निवडून आले, आमदार झाले. त्यामुळे त्यांचा वकिलीच्या
व्यवसायामध्ये खंड पडला. 1962 ते 1967 या काळात विधानसभेत त्यांनी
शेतकऱयांना अनेक प्रश्नांना वाचा फोडली. दुष्काळी भागातील लोकांचे प्रश्न
सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या काळात साहेबांची वाढणारी लोकप्रियता
ही काही मंडळीना आवडली नाही. तसेच साहेब हे आपल्या राजकीय प्रवाहाचे
साथीदार नाहीत ही जाणीव काहींना झाली व पुढच्या विधानसभेत हा पत्ता कसा
काटायचा याचे डावपेच झाले. व 1967 च्या विधानसभेत त्यांना काँग्रेसने तिकीट
नाकारले येथेच साहेबांना परावभ स्वीकारावा लागला. येथेच साहेबांचे राजकारण
संपले.
साभार : http://www.mysangli.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत