आष्टयाची ज्योती चोरमुले एनटी (सी) हिंदू-धनगर प्रवर्गातून पहिली
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परिक्षा (एमपीएसी) निकालात मराठी टक्का वाढत
असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीही आपली चमक राज्यपातळीवर दाखवत आहेत.
सांगली जिल्यातील वाळवा तालुक्यामधील आष्टा गावातील विद्यार्थ्यीनी कु.
ज्योती जालिंदर चोरमुले हिने पहिल्याच प्रयत्नात हा खडतर टप्पा पार करून
राज्यात हिंदु धनगर (सी) (एनटीसी) या प्रवर्गातून पहिला क्रमांक (एकूण गुण
1125) मिळवला आहे.
ज्योतीचे दहावी ते पुढील पदवी
पर्यंतचे शिक्षण आष्टा या गावातून पूर्ण केले. तसेच तिने पदवीनंतर काही
दिवस आष्टा या ग्रामीण भागातून (एमपीएसी) सहाय्यक विक्रीकर अधिकारी
परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मुख्यपरिक्षेची पायरीही केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात तिने (एमपीएसी)
सहाय्यक विक्रीकर अधिकारी परीक्षेत राज्यातून हिंदु धनगर (सी) (एनटीसी) या
प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवला. ज्योतीचे आई-वडील शेती करतात. तिने
आपल्या यशाचे श्रेय आई-वडीलांसह मित्र व शिक्षकांनाही दिले आहे. भाषा व
ग्रामीण भागाचा न्युनगंड न बाळगता जिद्द व विश्वासाने ग्रामील भागातील
विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्याची गरज तिने व्यक्त केली आहे.
तिच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत