धनगर समाजाची अस्मिता कै.बी.के.कोकरे..!

बी.के कोकरे यांची ओळख :
यशवंत सेनेचे संस्थापक सरसेनापती कै. बी .के. कोकरे यांचा जन्म बारामती तालुक्यातील उंडवडी येथे झाला. अत्यंत तल्लख बुद्धीची देणगी लाभलेल्या बी.के. कोकरे यांनी दहावी आणि बारावीच्या बारामती तालुक्यात

प्रथम क्रमांकाची कामगिरी केली. त्या जोरावर मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजीनीरिंगची पदवी घेतली.येथेपर्यतच्या प्रवासात बी.के.यांना आर्थिक व सामाजिक चटके सोसावे लागले .
यशवंत सेनेची स्थापना :
शिक्षण घेत असताना आर्थिक तसेच सामाजिक विषमतेचे चटके सोसलेल्या बी. के. नी किमान यापुढील पिढीला या यातना सोसाव्या लागू नयेत म्हणून आनेकाशी सामाजिक संघटनेची चर्चा करण्यास सुरवात केली.राज्यात दुसऱ्या क्रमाकांचा दावा करणाऱ्या धनगर समाजाची इकछ्त्री संघटना आवश्यक असल्याची खात्री पटल्यानंतर बी.के.कोकरे यांनी समाजातील काही तरुणांना घेऊन यशवंत सेनेची स्थापना केली.केवळ एंक जुनी मोटार सायकल व दुर्दम्य इच्छाशक्ती,समाजाबद्दल प्रामाणिक तळमळ यातूनच कै बी.के.कोकरे यांनी थोड्याच कालावधीमध्ये यशवंत सेनेची पाळेमुळे राज्यभर रुजवली.त्यातही सातारा ,सांगली , पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी , मुंबई,धुळे या जिल्ह्यात यशवंत सेनेचे जाले पसरवले.
यशवंत सेनेच्या माध्यमातून जनजागृती व आंदोलने :
वर्षानुवषे डोंगरदर्यात किंवा माळरानावर पाल टाकून शेंल्यामेध्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाज्याच्या अस्मितेला जागे करण्याचे काम कै.बी.के.कोकरे यांनी केले.सलग १० वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील धनगर समाजाला एकत्र करण्याचे व समाजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवण्याचे महान कार्य कै.बी.के.कोकरे यांचेमुळे होऊ शकले. या चळवळीची मूळ प्रेरणा कै.डॉ बी.व्ही.शेंबडे (ता.माण जी. सातारा) यांच्याकडून बी.के कोकरे यांना मिळाली.
आंदोलनाचा परिणाम :
एरवी रोजीरोटी साठी रानमाळावर भटकणाऱ्या धनगर समाजातून संघटीत उठाव झाल्यानंतर तत्कालीन शासनही दचकले.(काळ १९८८ चा होता मुख्यमंत्री पवार साहेब होते ) मेंद्धापालांच्या अनेक मागण्याबरोबर धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून तीव्र लढा उभा राहिला. परिणामी शासनाने धनगर समाजाची एस.टी. ची मागणी बाजूला ठेऊन भटक्या जमातीचे (एन.टी)आरक्षण बहाल केले. आत्तापर्यंत ओबीसी प्रवर्गात असलेल्या धनगर समाजाला एन.टी च्या सवलतीचा फायदा मिळाला असून त्याद्वारे कित्येक डॉक्टर , इंजिनेर, अधिकारी झाले आहेत.
बी.के.कोकारेंचा शेवट :
सामाजिक, राजकीय,शैक्षणिक घडामोडीपासून अंत्यंत दूर असलेल्या किंबहुना निद्रिस्थ अवस्थेत असलेल्या धनगर समाजाला जागृत करून काही प्रमाणात का होईना मुक्या प्रवाहात आणण्याचे अवघड कार्य कै.बी.के.कोकरे करत होते पण काळाचा महिमा आसा आला कि महाराष्टातील एका जेष्ट न जाणकार नेत्याने (बारामतीकर) बी.के.कोकरे यांचं आंदोलनाचा धसका घेऊन, आंदोलनामुळे सत्ता परिवर्तनाचा धोका ओळखून धनगर समाजातील काही पुढार्यांना हाताशी धरून बी.के.कोकरे व त्यांच्या आंदोलनाचा सौदा करून अंत: करण्यात आला व धनगर समाजासाठी झगडणारे तडफदार नेतृत्व संपवले ……..
बी.के कोकारेंचे स्वप्न अपूर्ण :
कै बी.के कोकरे यांची भारतीय घटनेमधील धनगर समाजाची एस.टी.ची मूळ मागणी व मेंधापालासाठीच्या मागण्या तस्याच राहिल्या ………..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.